आज 14 डिसेंबररोजी, मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी(astrology) दुपारी 4 वाजून 59 मिनिटांपर्यंत राहील. सकाळी 8 वाजून 27 मिनिटांपर्यंत सिद्धी योग जुळून येईल, त्यानंतर साध्य योग राहील. आज राहू काळ सकाळी 9 वाजता सुरु होईल ते 10 वाजून 30 मिनिटांपर्यंत असेल.
याशिवाय आज श्री दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात दत्त जयंतीला मोठे महत्व आहे. दत्त जयंतीला धार्मिक मान्यतेनुसार श्रीदत्तात्रेयसह लक्ष्मी-नारायणाची पूजा केली जाते. तर आजच्या या शुभ दिनी श्री दत्त गुरूंची कोणत्या राशींवर कृपा असणार ते पाहुयात.
धनू रास : आज या राशीच्या(astrology) व्यक्तींना अचानक धनलाभ संभवतो. शिक्षणाबाबत तुम्हाला नव्या संधी मिळतील. कलेच्या क्षेत्रात असणाऱ्या व्यक्तींना व्यासपीठ मिळेल. आजचा दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. तुमच्या सर्व मनोकामना श्री दत्त गुरू पूर्ण करतील.
मकर रास : आज या राशीच्या व्यक्तींवर श्री दत्त गुरू यांची कृपा असेल. कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होईल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका.
कुंभ रास : आज तुमचा जवळचा प्रवास योग आहे. जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. आज तुम्हाला काहीतरी सरप्राइज मिळेल. दिवसाच्या शेवटी शुभवार्ता ऐकायला मिळेल.आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे.
मीन रास : व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. आज बाहेर फिरायला जायचा प्लॅन ठरेल. तुम्हाला आज जुने मित्र भेटतील.त्यांच्याशी गप्पा-गोष्टी रंगतील.
हेही वाचा :
शाहरुख खानमुळे ‘पुष्पा’ एका दिवसात जेलमधून बाहेर
इचलकरंजीत बँक अधिकाऱ्यांसाह वकिलावर गुन्हा दाखल
अल्लू अर्जुनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी