लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी

मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजनेसाठी(Yojana) अर्ज करण्याची आज 15 ऑक्टोबर ही शेवटची संधी आहे. यापूर्वी सरकारने मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर ही शेटवची तारीख दिली होती. त्यानंतर मुदतवाढ करत ही तारीख 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

आज या योजनेसाठी(Yojana) अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. यापूर्वी महाष्ट्रातील महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतींनी अर्ज केला होता. मात्र आता तसं नाही. आता महिलांना केवळ अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज करायचा आहे. आता ज्या महिला या योजनेसाठी अर्ज करणार आहेत, त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण अट ठेवण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लडकी बहिण योजनेसाठी आता ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने यावर्षी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद आहे. ज्या महिलांनी अद्याप या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी केलेली नाही त्यांना आज म्हणजेच 15 ऑक्टोबर पर्यंत वेळ आहे.

सुरुवातीला या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट होती. मात्र महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता अर्ज करण्याची तारीख 31 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र, काही कारणांमुळे या मुदतीतही अनेक महिलांना अर्ज भरता आला नाही. अशा महिलांना या योजनेच्या नोंदणीसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी आतापर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची संधी दिली जात होती. मात्र आता तिसऱ्या टप्प्यात करण्यात आलेल्या मुदतवाढीनंतर महिलांना ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार नाहीत. आता महिलांना अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, गट संसाधन व्यक्ती (CRP), आशा सेवक, प्रभाग अधिकारी, CMM ( सिटी मिशन मॅनेजर), महानगरपालिका बालवाडी सेवक, मदत कक्ष प्रमुख किंवा आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी जाऊन ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा लागणार आहे. या अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

  • महाराष्ट्रातील रहिवासी महिला या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महिला अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • सर्व विवाहित, अविवाहित, घटस्फोटित आणि गरीब महिलास या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • अर्जदाराच्या नावावर कोणत्याही बँकेत बँक खाते असावे.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

या कागदपत्रांची आवश्यकता असेल

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र
  • बँक खाते
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • शिधापत्रिका
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • उत्पन्नाचा पुरावा (पिवळे आणि केशरी शिधापत्रिकाधारकांनी उत्पन्नाचा पुरावा देणे आवश्यक नाही.)
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • मतदार ओळखपत्र

हेही वाचा:

लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, खात्यात येणार 5500 रुपयांचा बोनस; पण…

विधानसभेची घोषणा होण्याआधीच संजय राऊतांचा मोठा दावा

आज वृद्धी योगासह बनले अनेक शुभ योग; वृश्चिकसह 5 राशींना होणार डबल लाभ