आज 31 ऑक्टोबररोजी आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी(astrology) आहे. आजच्याच दिवशी नरक चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. या खास दिवशी सुगंधित उटणे लावून स्नान करण्यात येते. भगवान श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध करून सुमारे 16 हजार स्त्रियांची मुक्तता केली होती. त्यामुळे आजच्या दिनी नरक चतुर्दशी साजरी केली जाते.
यासोबतच या दिवशी लोक यमदेवासाठी(astrology) दिवा लावून कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. नरक चतुर्दशीला देवी लक्ष्मी, यमराज, भगवान श्रीकृष्ण, काली माता, भगवान शंकर, भगवान हनुमान आणि भगवान विष्णू यांच्या वामन स्वरुपाची पूजा केली जाते. प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्ष तिथीला नरक चतुर्दशी साजरी करतात. तर, आजच्या या दिवशी कोणत्या राशीच्या आयुष्यात सुख-समृद्धी येणार ते पाहूयात.
मेष:- आज तुमचा प्रभाव वाढीस लागेल. तुमची लोकप्रियता वाढीस लागेल. वाहन खरेदीचे काम पुढे सरकेल. व्यावसायिक क्षेत्रात प्रगती कराल.
वृषभ:- तुमच्या व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडतील. सामाजिक वर्तुळ वाढेल. आज तुम्ही दिवाळीच्या फराळावर ताव माराल. कुटुंबासोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.
मिथुन:- आज तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे अडकलेले पैसे मिळतील. विद्यार्थ्यांनी संयम राखावा. एकाग्रतेने कामे करावीत.
कर्क:- भावंडांसोबत दिवाळी साजरी कराल. इतरांना आनंदात सहभागी करून घ्याल. भौतिक गोष्टींवर खर्च कराल. व्यवसायात अधिक व्यस्त राहाल.
सिंह:- आत्मविश्वासाच्या बळावर कामे कराल, त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण कराल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.
कन्या:- आजचा दिवस चांगला जाईल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्यात सुधारणा दिसून येईल. मुलांकडून आनंद वार्ता मिळेल.
तूळ:- नवीन गोष्टीबद्दल तुम्हाला आकर्षण निर्माण होईल. तुमचे शब्द खरे ठरतील. नवीन कामासाठी मार्ग मोकळा होईल. जुन्या मित्रांची गाठ पडेल. जुन्या आठवणीत रमून जाल.
वृश्चिक:- आजचा दिवस खर्च करणारा असेल. मुलांकडून मनाजोगी कामे पार पडतील. कौटुंबिक कामे सुरळीत पार पडतील. आवडत्या व्यक्तीची गाठ पडेल.
हेही वाचा :
अकोला जिल्ह्यातील मतदान वाढवण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांना गती
पंढरपूर विधानसभेसाठी दाखल 51 उमेदवारी अर्ज; राजकीय तापमान उंचावले
आळंदी रस्त्यावरील कळस गावात दोन गटांमध्ये हाणामारी; गावात तणावाचे वातावरण