आज 11 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील(zodiac signs) अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी रात्री 12 वाजून 7 मिनिटांपर्यंत राहील. तसेच उत्तराषाढा नक्षत्र शनिवारी पहाटे 5 वाजून 26 मिनिटांपर्यंत जागृत असेल. तर आज राहू काळ सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल.
त्याचबरोबर आज शारदीय नवरात्रीचा नववा दिवस आहे. आज दुर्गा देवीचे नववे रूप सिद्धिदात्रीची पूजा केली जाईल. देवी सिद्धिदात्रीची आराधना केल्याने भक्तांचे सर्व दुःख, भय आणि रोग नष्ट होतात असे मानले जाते. आज सिद्धिदात्री देवी कोणत्या राशीवर(zodiac signs) कृपादृष्टी ठेवणार, ते पाहुयात.
मेष रास : आज तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. नवीन नोकरीसाठी विचारणा कराल. हातात घेतलेले सगळे काम सुरळीत पार पडेल. सकारात्मक विचार कराल.
वृषभ रास : व्यापारी वर्गाला आजचा दिवस लाभदायक असणार आहे. नवीन मित्रांशी संवाद होईल. जोडीदाराच्या मताचा विचार करावा. घरगुती वस्तूंची खरेदी कराल. आरोग्याच्या समस्या सुटतील.
मिथुन रास : नातेवाईकांशी संबंध सुधारतील. धाकट्या भावंडांना मदत कराल. दिवस मध्यम फलदायी. आजचा दिवस प्रसन्न जाईल. धार्मिक ठिकाणी भेट द्याल. त्यामुळे मानसिक शांतता मिळेल.
कर्क रास : पैशाची गुंतवणूक योग्य प्रकारे करा. जोडीदाराविषयी नाराजी चटकन दर्शवू नका. जवळचे मित्र भेटतील. क्षुल्लक मतभेद होण्याची शक्यता.
सिंह रास : कामात नवीन अधिकार हाती येतील. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. भावंडांच्या सहवासात रमून जाल. तुमच्यावर आज देवी सिद्धिदात्रीची कृपा राहील.
कन्या रास : आज तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. आज जवळचा प्रवास योग आहे. तुमचे सरकारी काम मार्गी लागेल. सरकारी योजनेचे पैसे मिळतील. यामुळे आनंदी राहाल.
हेही वाचा:
रतन टाटांच्या निधनानंतर काय स्थिती टाटा ग्रुप्सच्या शेअरची? काय म्हणतंय शेअर बाजार?
टीम इंडियाला धक्का! रोहित शर्माचा मोठा निर्णय; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधीच…
PAK vs ENG: पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची अद्भुत बॉलिंग, एक ‘द्विशतका’जवळ!