आज अनेक शुभ योग; 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार

आज सोमवार, 14 ऑक्टोबर रोजी चंद्र शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, तर चंद्रापासून 10व्या घरात शुभ ग्रह, म्हणजेच शुक्राच्या उपस्थितीमुळे अमला योग(astrology) तयार होत आहे. तसेच आज अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी असून या दिवशी अमला योगासह वृद्धी योग आणि शतभिषा नक्षत्राचा शुभ संयोग असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मिथुन रास
मिथुन राशीच्या(astrology) लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना आज गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल आणि त्यांना सकाळी चांगली बातमी मिळेल. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती साधू शकाल आणि अधिकाऱ्यांच्या पाठिंब्याने तुम्हाला दिलासा मिळेल. सासरच्या लोकांमध्ये काही गैरसमज चालू असतील तर ते आज संपुष्टात येतील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

कर्क रास
आजचा दिवस कर्क राशीसाठी चांगला असेल. प्रलंबित कामं पूर्ण होतील. जर तुम्ही आज कुठेतरी पैसे गुंतवले तर तुम्हाला भविष्यात दुप्पट नफा मिळेल, ज्यामुळे तुमची भविष्याची चिंता कमी होईल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने लोकप्रियता आणि आदर वाढेल. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना प्रगतीच्या चांगल्या संधी मिळतील आणि नफाही होईल. तुम्हाला प्रत्येक पावलावर भावा-बहिणीची मदत मिळेल, ज्यामुळे घरातील कामं सहज पूर्ण होतील आणि कुटुंबातील सर्व सदस्यांमधील संबंधही चांगले राहतील.

कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. कन्या राशीच्या लोकांच्या अनेक इच्छा आज महादेवाच्या कृपेने पूर्ण होतील. तुम्हाला संपत्ती आणि वाहन सुख मिळण्याचीही शक्यता आहे. आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला जाईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांना त्यांच्या प्रयत्नांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना आज दुसऱ्या कंपनीकडून चांगली ऑफर मिळू शकते. कुटुंबात काही तणाव किंवा गैरसमज चालू असतील तर ते आज दूर होतील आणि सर्व सदस्य एकमेकांना कामात मदत करण्यासाठी पुढे येतील.

कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना भगवान शंकराच्या कृपेने आज अचानक मोठी रक्कम मिळू शकते, ज्यामुळे तुम्ही कुटुंबातील जबाबदाऱ्या पार पाडण्यात यशस्वी व्हाल. व्यावसायिक आज दिवसभर ग्राहकांमध्ये व्यस्त राहतील आणि त्यांना उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. तुमचं एखादं काम खूप दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते तुमच्या भावांच्या मदतीने सहज पूर्ण होईल. तसेच या राशीचे लोक ज्यांना परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मीन रास
मीन राशीच्या(astrology) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. मीन राशीचे लोक आज त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकतात आणि त्यांना त्यांच्या मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमचा तुमच्या भावांसोबत काही वाद होत असेल तर तो आज संपेल आणि सर्व प्रकारचे गैरसमजही दूर होतील. नोकरी करणाऱ्यांना आज त्यांच्या सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते कार्यालयीन कामे वेळेवर पूर्ण करतील आणि मजेदार मूडमध्ये दिसतील.

(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

राष्ट्रवादीचा अजून एक नेता बिश्नोई गँगच्या टार्गेटवर?, धक्कादायक माहिती समोर

कोणीही येतं आणि गोळ्या घालतं, महाराष्ट्राचा बिहार होतोय, जयंत पाटील 

मेगा-लिलावापूर्वी एका निर्णयाने मुंबई इंडियन्समध्ये खळबळ, ‘या’ व्यक्तीचे झाले पुनरागमन