ग्रहांच्या स्थितीनुसार, आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आज गुरुवार, 25 जुलै रोजी कुंभ राशीनंतर(astrology) चंद्र मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि वृषभ राशीत गुरू मंगळाच्या संयोगाने गुरु मंगळ योग तयार होत आहे.
तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील पाचवी तिथी असून या दिवशी गुरु मंगळ योगासह(astrology) शोभन योग, शुक्रादित्य योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना आज तयार होत असलेल्या शुभ योगांचा लाभ मिळेल. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या
मिथुन रास
आजचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर असणार आहे. आज स्वामींच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांच्या सर्व चिंता दूर होतील आणि गुंतवणुकीसाठीही दिवस चांगला आहे. जर तुम्ही कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडकले असाल तर आज तुम्हाला दिलासा मिळेल आणि सरकारी कामंही कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. नोकरदार लोकांच्या कामाचं त्यांच्या कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. त्याचबरोबर व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकेल आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यातही ते यशस्वी होतील. वैवाहिक जीवनाविषयी बोलायचं झालं तर, जोडीदारासोबतचं नातं मजबूत राहील आणि दोघेही एकमेकांना समजून घेऊन काम करतील.
कर्क रास
आजचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे. कर्क राशीच्या लोकांना आज नवीन यश मिळेल आणि त्यांचं आरोग्य देखील चांगलं राहील. अविवाहित लोक आज मनात असलेल्या व्यक्तीला प्रपोज करून नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी पुढाकार घेऊ शकतात. व्यापारी आपलं कौशल्य दाखवून चांगला नफा कमावतील आणि आपला व्यवसाय पुढे नेतील. नोकरीतील लोक आज आपले ध्येय साध्य करतील आणि अधिकारीही तुमचं कौतुक करताना दिसतील. तुम्ही अध्यात्मिक बाबींमध्ये अधिक रस दाखवाल आणि धर्मादाय कार्यात काही पैसे खर्च करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होण्याची चिन्हं आहेत.
कन्या रास
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आणि फलदायी असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना नशिबाने साथ दिल्यास त्यांच्या अनेक इच्छा पूर्ण होतील आणि ते चांगले पैसे कमवण्यातही यशस्वी होतील. एकाग्रतेसह विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची क्षमता आज सुधारेल, ज्यामुळे ते शिक्षणात चांगली कामगिरी करतील. नोकरदार लोकांची करिअरमध्ये चांगली प्रगती होईल आणि इतर कंपनीकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर येऊ शकते.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांपासून आराम मिळेल आणि कोणाकडून तरी अडकलेले पैसे मिळतील. रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांना चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावाही मिळेल. नोकरदार लोकांना आणि व्यावसायिकांना कामाच्या ठिकाणी आपला ठसा उमटवण्याची संधी मिळेल आणि तुमच्या कल्पनांचंही कौतुक होईल. मोठ्यांच्या सल्ल्याने आणि आशीर्वादाने तुमची अनेक कामं पूर्ण होतील.
धनु रास
आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना आज वडिलोपार्जित मालमत्तेचा आणि पैशाच्या इतर अनपेक्षित स्त्रोतांचा फायदा होऊ शकतो आणि ते मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकतात. मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील आणि शिक्षकांचंही सहकार्य मिळेल. तुमची प्रलंबित कामंही आज सहज पूर्ण होतील आणि तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचं पूर्ण सहकार्य मिळेल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आजचा दिवस शुभ असेल.
(टीप : वरील सर्व बाबी केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
ॲमेझॉनवरून केली ऑर्डर अन् बॉक्स उघडताच सापडला जिवंत सरडा…
फ्रोजन मटारचे सेवन करताना काळजी घ्या: जाणून घ्या त्याचे संभाव्य दुष्परिणाम
ऑलिम्पिक तिरंदाजी स्पर्धा: पदकाची आशा घेऊन सहा भारतीयांचा सहभाग