मराठा आंदाेलकांचा रास्ता राेकाे, 3 तासांपासून वाहतुक खाेळबंली

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटील(protesters) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज (गुरुवार) सकाळपासून मराठा समाजाने लातूर बीड महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन छेडले आहे. परिणामी लातूर बीड महामार्गावरील वाहतूक खाेळंबली आहे. दरम्यान दूसरीकडे बार्शी तहसील कार्यालयासमोर उपाेषणास बसलेल्या आंदाेलकाची तब्येत ढासळल्याची माहिती समाेर आली आहे.

मराठा आरक्षण आणि सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी(protesters) व्हावी अशी मागणी करत आज लातूर जिल्ह्यातील मराठा समाज लातूर बीड महामार्गावर आला. यावेळी आंदाेलकांनी रास्ता राेकाे आंदाेलन केले. यामुळे महामार्गावर लांबच्या लांब रांगा लागल्या. सुमारे अडीच तासांपाूसन सुरु असलेल्या या आंदाेलनामुळे लातूर बीड महामार्गावरील वाहतुक खाेळंबली आहे.

साेलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे मराठा आरक्षणासाठी सलग सहाव्या दिवशी मराठा बांधवाचे आमरण उपोषण सुरु आहे. आज उपोषणकर्ते आनंद काशीद या मराठा बांधवाची तब्येत खालावली. आनंद काशीद यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला. काशीद यांच्या आंदाेलनस्थळी प्रांताधिकारी तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांनी भेट दिली हाेती मात्र काशीद हे उपोषणावर ठाम राहिले.

हेही वाचा :

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन-मलायकामध्ये ‘पोस्ट वॉर’

ग्राहकांना मोठा धक्का! एटीएममधून पैसे काढणे होणार महाग

“वहिनी का चिडल्या?”; भारतविरुद्ध पाक सामन्यादरम्यानचा अनुष्काचा व्हिडीओ Viral