बंगळुरूमधील ट्रॅफिक(Traffic) समस्या सोडवण्यासाठी आता एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ट्रॅफिक कोंडीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या या शहरात ‘अडॅप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम’ सिग्नल्स बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ज्यामुळे वाहतूक अधिक प्रभावीपणे नियंत्रित केली जाईल.
अहवालानुसार, डिसेंबरपर्यंत शहरातील १६५ प्रमुख जंक्शन्सवर ATCS सिग्नल्स कार्यरत होतील. त्यामध्ये १३६ जंक्शन्सना अपग्रेड करण्यात येईल, तर २९ नव्या सिस्टीम्स बसविल्या जातील. या अत्याधुनिक प्रणालीमुळे ट्रॅफिक(Traffic) कर्मचाऱ्यांचा ताण कमी होईल आणि वाहतुकीचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम होईल.
सप्टेंबरपर्यंत सुमारे 900 जंक्शन्स ट्रॅफिक कर्मचाऱ्यांच्या मदतीने चालवली जात होती, तर 405 जंक्शन्सवर आधीच सिग्नल सिस्टीम कार्यरत होत्या. वर्षाअखेरीस 500 जंक्शन्स ATCS सिस्टीमने सुसज्ज असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा:
लहान मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा बटाटा पोहा टिक्की
१० वर्षांनी पाळणा हालला, बारसं आटोपून येताना भीषण अपघात आई बाळासह चौघांचा मृत्यू
आरक्षणावर राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात भाजपचे तीव्र आंदोलन