सोन्याच्या खाणीतील दुर्दैवी घटना: उपासमारीने 100 कामगारांचा अंत, हृदयद्रावक दृश्ये Video Viral

दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतील स्टिलफोंटेनजवळ बफेल्सफोंटेन येथील सोनेखाणीतील (gold)100 कामगारांच्या मृत्यूच्या झाला असून या घटनेने संपूर्ण जगाला हादरवून टाकले आहे.

हे सर्व कामागार (gold)सोन्याच्या खाणीत बेकायदेशीरपणे उत्खनन करत होते. ही खाण जवळपास 2.5 किमी खोल असून तिथे अनेक कामगार अडकले होते. आता या कामागारांचा भूकेने तडफडून मृत्यू झाला असल्याचे माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खाणीत अडकलेल्या कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून अन्न आणि पाण्याचा पुरवठा बंद होता. भूकेने आणि तहानेने त्रस्त होऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती कामगारांनी मोबाईलद्वारे पाठवलेल्या व्हिडिओतून समोर आली.

या व्हिडिओमध्ये प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली मृतदेह दिसली. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माइनिंग अफेक्टेड कम्युनिटीज यूनाइटेड इन एक्शन ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 26 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून 18 मृतदेह बाहेर काढले आहेत. मात्र, खाण इतकी खोल आहे की आत अजूनही सुमारे 500 कामगार अडकले असण्याची शक्यता आहे.

या घटनेत पोलिस आणि कामगारांमध्ये मोठा संघर्ष उभा राहिला. पोलिसांनी खाण सील करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कामगारांमध्ये संताप उसळला. कामगारांनी आरोप केला की पोलिसांनी त्यांच्या रस्स्या काढून टाकल्यामुळे ते बाहेर पडू शकले नाहीत.

तर पोलिसांचे म्हणणे आहे की, कामगारांना अटक होण्याची भीती होती आणि त्यामुळे ते बाहेर येत नव्हते. मीडिया रिपोर्टनुसार, कामगारांचा मृत्यू प्रामुख्याने उपासमारीमुळे झाला. खाणीत अन्न-पाण्याचा पुरवठा थांबवण्यात आल्याने ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने खाणींतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दक्षिण आफ्रिकेत अवैध खाणकाम ही मोठी समस्या आहे. मोठ्या कंपन्या खाणी बंद करून सोडून दिल्यानंतर स्थानिक लोक उरलेले सोने मिळवण्यासाठी त्या खाणीत प्रवेश करतात. मात्र, हा प्रयत्न त्यांच्यासाठी अत्यंत धोकादायक ठरतो. या घटनेमुळे अवैध खाणींचा धोका आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे होणाऱ्या दुर्घटनांकडे लक्ष वेधले गेले आहे. कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून खाण व्यवस्थापनावर कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

हेही वाचा :

सरकार पुरावे नष्ट होण्याची वाट पाहतंय का?; रोहित पवारांचा संतप्त सवाल, म्हणाले, अजितदादांनी…

तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत!

राजकारणात मी अनेक वर्षांपासून, अनेकांचे पतंग कापले, पण…; छगन भुजबळ यांचं मोठं विधान!