अन्वयार्थ : असले ‘अव्वल स्थान’ काय कामाचे?

अल्पवयीन क्रीडा(Sports)पटूंमधील उत्तेजक सेवनाच्या गेल्या दहा वर्षांतील अहवालांचा लेखाजोखा ‘वाडा’नेच मांडला.

पॅरिसमध्ये लवकरच ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा होत असून,(Sports) या स्पर्धामधील भारतीयांच्या कामगिरीविषयी देशभर रास्त उत्सुकता आहे. याचे कारण अलीकडच्या काळात ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धामध्ये भारतीय खेळाडू जिंकत असलेल्या पदकांची संख्या आणि पदक मिळणाऱ्या क्रीडाप्रकारांची संख्या वाढू लागली आहे. तसे पाहता लोकसंख्येच्या आणि देशाच्या अवाढव्य आकाराच्या तुलनेत पदकांचे हे प्रमाण नगण्य असले, तरी प्रदीर्घ दुष्काळानंतर तुरळक पावसाचे हंगामही समाधानकारक वाटू लागतात, तसे हे. शिवाय क्रीडा क्षेत्रातही ‘गेल्या दहा वर्षांतच’ नेत्रदीपक यश मिळू लागल्याचा साक्षात्कार झालेल्यांची संख्या आपल्याकडे वाढू लागली आहे. अशा उत्सवी वातावरणात एका महत्त्वाच्या आकडेवारीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास आपले, जागतिक क्रीडा परिप्रेक्ष्यातील माफक यशही डागाळले जाऊ शकते. त्याविषयी खबरदारी घेण्याची वेळ हीच आहे, असे ही आकडेवारी बजावते. ‘वल्र्ड अँटी डोपिंग एजन्सी’ अर्थात ‘वाडा’ ही क्रीडा क्षेत्रातील उत्तेजकप्रतिबंधक नियमावली आणि दंडसंहिता आखणारी जागतिक संघटना.

या संघटनेने नुकत्याच प्रसृत केलेल्या अहवालानुसार, २०२२ या वर्षांत उत्तेजक चाचणीनंतर दोषी आढळलेल्या नमुन्यांची सर्वाधिक संख्या भारतात आढळून आली. या वर्षांत भारताच्या नॅशनल अँटी डोपिंग लॅबोरेटरीने (एनएडीएल) घेतलेल्या ४०६४ नमुन्यांपैकी १२७ नमुने दोषी म्हणजे बंदी घातलेल्या उत्तेजकांनी युक्त आढळून आले. दोषी नमुन्यांचे प्रमाण ३.२६ टक्के इतके आढळून आले. ही संख्या व प्रमाण हे दोन्ही सर्वाधिक आहे. दोन महिन्यांपूर्वी आणखी एक आकडेवारी प्रसृत करण्यात आली. अल्पवयीन क्रीडापटूंमधील उत्तेजक सेवनाच्या गेल्या दहा वर्षांतील अहवालांचा लेखाजोखा ‘वाडा’नेच मांडला. या यादीमध्ये रशियापाठोपाठ भारत दुसऱ्या स्थानावर होता. म्हणजे केवळ प्रौढ क्रीडापटूच नव्हे, तर अल्पवयीन क्रीडापटूंमध्येही कामगिरी उंचावण्यासाठी उत्तेजकांचा वापर करण्याची प्रवृत्ती फोफावलेली दिसून येते.

हेही वाचा :

आर्यन खान याला 8 वर्ष मोठ्या गर्लेफ्रेंडने दिली flying kiss, किंग खानचा लेक लाजला आणि…

महाराष्ट्र हादरलं! 22 वर्षीय तरुण जहाजावरुन बेपत्ता; शिप मॅनेजमेंट कंपनीत करत होता काम

बच्चू कडू यांचा महायुतीवर आणखी एक ‘प्रहार’, सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा