धुळे शहरातील देवपूर परिसरातील एल एम सरदार हायस्कूल समोर ट्रक(driver) व दुचाकीचा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला आहे. परिसरातील संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक करून ट्रकच्या दोन्ही काचा फोडल्या असून घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे.
ट्रक खाली चिरडून मृत्युमुखी पडलेला(driver) तरुण हा 18 ते 20 वयाचा असून वाहनावरून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची माहिती देवपूर पोलीस घेत असून, या अपघातानंतर परिसरात एकच खबाळ उडाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी एकत्र येत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु देवपूर पोलिसांनी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला असून सध्या तणावपूर्ण शांतता परिसरात बघावयास मिळत आहे.
हेही वाचा :
7 तासांत 15 निष्पाप मुलांचा बळी; सरकारी यंत्रणा ठरतेय फेल…
एक शो दोन विजेते, ‘Dance Deewane 4’च्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं
वीस वर्षांपूर्वी निधन झालेल्या ‘या’ अभिनेत्रीसारखी हुबेहूब दिसते आराध्या