डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले आहेत. यात कर्मचारी कपातीचाही समावेश आहे. संघीय सरकारमधून कर्मचारी(employees) कपातीच्या मोहिमेला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत सरकारकडून कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या बायआऊट ऑफरचा स्वीकार करण्यात आला आहे. या ऑफरचा स्वीकार करून जवळपास 40 हजार कर्मचाऱ्यांनी नोकरीतून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प प्रशासनाने कर्मचाऱ्यांना(employees) स्वेच्छानिवृत्ती घेण्याची ऑफर दिली होती. यासाठी 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. कर्मिक विभागाकडून पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयात येण्यास सांगण्यात आले होते.
या कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात काम करावे लागणार आहे. नोकरीतून राजीनामा दिल्यास आठ महिन्यांचा पगार आणि निश्चित भत्ता दिला जाईल अशी ऑफर सरकारने दिली होती. या ऑफरला मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. सरकारने जे उद्दीष्ट निश्चित केले होते ते साध्य करता आले नाही.
हेही वाचा :
शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार?
रोहित शर्माची शेवटची वन डे मालिका?
उपाशी पोटी दही खाणे सगळ्यांसाठी फायदेशीर नसते; जाणून द्या तुमच्यासाठी योग्य की त्रासदायक