कळंबा कारागृहात कैद्याचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला

कोल्हापुरातील(kolhapur) कळंबा कारागृहात कैद्याने तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याच्या विराेधात राजवाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळंबा(kolhapur) कारागृहातील बंदीजन विवेक उर्फ सोन्या सोपान काळभोर याने तुरुंग अधिकारी भारत उत्तरेश्वर पाटील यांच्यावर काठीने हल्ला चढविला. काळभाेर याने पाटील यांना लाथा देखील मारल्या.

नातेवाईकांच्या भेटीसाठी मुलाखत कक्षात घेऊन जाण्यासाठी वेळ केल्याच्या रागातून काळभोरने पाटील यांच्यावर हा हल्ला केल्याचे समजते. या मारहाण प्रकरणी विवेक काळभोर याच्यावर राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला आहे.

हेही वाचा :

सर्फिंग करताना शार्कचा हल्ला, हॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू

भाजपला धक्का! दोस्ती संपली आता फक्त दुश्मनी…

सोनाक्षी सिन्हाने लग्न होताच उचललं मोठं पाऊल…