पुणे (pune)कल्याणीनगर हिट ऍण्ड रन प्रकरणात रोज नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. पबमध्ये पार्टी केल्यानंतर वेदांत अग्रवाल आणि त्याचे मित्र दोन गाडय़ांमधून निघाले होते. त्यांनी रेस लावली होती आणि त्यामुळे दुर्घटना घडली. पोर्शे कार दुर्घटनाग्रस्त झाली, पण दुसरी कार पळून गेली. त्या कारमध्ये कोण होते याचा शोध आता सुरू झाला आहे.
पबमध्ये पार्टी केल्यानंतर वेदांत अग्रवाल आणि त्याचे दोन मित्र पोर्शे कारमध्ये होते. दुसऱया गाडीमध्ये इतर मित्र होते. मद्यधुंद झाल्याने त्यांना पूर्ण शुद्धही नव्हती. त्या धुंदीत त्यांनी कारची रेस लावली. वेदांतने इतक्या वेगाने कार चालवली की त्या वेगामुळे निर्माण झालेल्या आवाजाने रस्त्याच्या दुतर्फा जाणाऱया पादचाऱयांचेही लक्ष वेधले होते. वेदांतच्या कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर पादचारी धावले तेव्हा गाडीमध्ये तिघे जण होते. त्यातील एक जण पळून गेला आणि दोघांना लोकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.(pune)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये यासंदर्भात माहिती दिली. ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे यांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले, त्यासाठी डॉ. तावरेंना कोणाचा फोन होता हे राज्य सरकारने स्पष्ट केले पाहिजे, असे पटोले म्हणाले. डॉ. तावरे यांनीच सर्वांची नावे उघड करेन असे सांगितल्याने त्यांच्या जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे सरकारने डॉ. तावरेंना सुरक्षा पुरवावी अशी मागणीही त्यांनी केली.
हेही वाचा :
“हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, मग सांगलीत हट्ट कशासाठी?” कदमांनी ठाकरेंना डिवचले
हार्दिक पंड्यावर क्रिकेट फॅन्सचा संताप का? रोहितची कॅप्टनसी नव्हे, तर ही आहेत कारणं
लग्नाच्या एका महिन्यातच नवऱ्याच्या ‘या’ सवयीमुळे दु:खी नवी नवरी, 1 तास बाथरूममध्ये..