दोन अग्नीवीरांचा मृत्यू; मृत्यूचे कारण ऐकून अंगावर येईल काटा

भारतीय सैन्यदलात एक दुःखद घटना घडली आहे. नाशिक येथील देवळाली कॅम्पमध्ये भारतीय सैन्यातील दोन अग्नीवीरांचा(firefighting system) मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, देशात अग्नीवीर(firefighting system) योजना सुरु झाल्यापासून अग्नीवीर योजनेतील सैनिकांना प्रशिक्षण नाशिक जिल्ह्यातील देवळाली या भागात दिले जात आहे. या गुरुवारी (10 ऑक्टो) दोन अग्नीवर जवानांना तोफेचा गोळा लोड करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते. मात्र त्यावेळी गोळा लोड करताना अचानक स्फोट झाला.

मात्र या या स्फोटामध्ये गोहिल सिंग आणि सैफत शित हे दोन्ही अग्नीवर गंभीर जखमी झाले. मात्र त्यावेळी त्यांना तातडीने देवळाली येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. मात्र आता पोलीस आणि लष्कराकडून या संपूर्ण घटनेची चौकशी करणार आहेत.

या घटनेवेळी आयएफजी फील्ड गणचा तुकडा हा शरीरात घुसल्याने त्या दोन्ही जवानांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात नाशिकच्या देवळाली पोलीस ठाण्यात या मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे.

याशिवाय या धक्कादायक घटनेत एक अग्निवीर जखमी झाला आहे. मात्र त्याच्यावर देवळाली येथील सैनिकी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा:

गुड न्यूज! दसऱ्या आधीच सोनं झालं स्वस्त…

जात लपवण्यासाठी स्वीकारलं ‘बच्चन’ आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?

मध्यरात्री पुन्हा एकदा हिट अँड रन! डिलिव्हरी बॉयचा मृत्यू, भरधाव ऑडीने आधी चिरडले अन्…