म्हैसूर : मुडा (म्हैसूर नागरी विकास प्राधिकरण) घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री(Minister) सिद्धरामय्या यांच्या अडचणींत वाढ होणार असल्याचे म्हटले जात आहे. म्हैसूर शहरी विकास प्राधिकरण प्रकरणात लोकायुक्त पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत मी त्यांना सत्य सांगितले आहे, असा दावा सिद्धरामय्या यांनी बुधवारी केला. सिद्धरामय्या यांची सुमारे दोन तास चौकशी झाल्याची माहिती देण्यात आली.
मुडा घोटाळा सुमारे 3.2 एकर जमिनीच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. या जमिनीच्या बदल्यात मुडा यांनी मुख्यमंत्री (Minister) सिद्धरामय्या यांच्या पत्नीला भूखंडाचे वाटप केले होते. या भूखंडांच्या वाटपात कथित अनियमितता झाल्याचा आरोप आहे. याच आरोपावरून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या बुधवारी लोकायुक्तांसमोर हजर राहिले होते.
लोकायुक्त पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव आरोपी क्रमांक एकवर नाव आहे. मुडाद्वारे त्यांची पत्नी पार्वती यांना 14 भूखंड वाटपात अनियमितता केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
बुधवारी लोकायुक्त पोलिसांनी सिद्धरामय्या यांची सुमारे दोन तास चौकशी केली. चौकशी आटोपल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले की, सर्व काही कायदेशीररित्या घडले आहे, भाजप आणि जद (एस) खोटे आरोप करत आहेत. मी लोकायुक्त पोलिसांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, त्यांना लोकायुक्त पोलिसांनी सांगितले होते का, असे विचारले असता. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता, माझी चौकशी करण्यात आली होती, मी सत्य सांगितले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त योजनेंतर्गत, मुडाने त्यांच्याकडून घेतलेल्या अविकसित जमिनीच्या बदल्यात निवासी संकुल बांधण्यासाठी भूखंड देणाऱ्यांना 50 टक्के विकसित जमिनीचे वाटप केले होते. लोकायुक्त पोलिसांनी 27 सप्टेंबर रोजी सिद्धरामय्या, त्यांची पत्नी, त्यांचे जवळचे नातेवाईक मल्लिकार्जुन स्वामी आणि देवराजू नावाच्या व्यक्ती आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मल्लिकार्जुन स्वामींनी देवराजूकडून जमीन खरेदी करून पार्वती यांना भेट दिल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा :
आठवड्याभरातच चमकदार त्वचा हवीय?
दिवाळी फराळ तळल्यानंतर तेल उरलंय; ‘या’ पद्धतीने पुन्हा वापरा तळणीचे तेल
रिलायन्स जिओचा आयपीओ धमाका करणार,भारतातील सर्वात मोठा आयपीओ कधी येणार?