जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ(death) शहरात गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. या भयंकर घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर गोळीबाराच्या(death) घटनेने हादरुन गेले आहे. भुसावळ शहरातील जुना सातारा रोड परिसरातील मरी माता मंदिराजवळ दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या वेळी झालेल्या गोळीबारामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनील राखुंडे अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
संतोष बारसे आणि सुनील राखुंडे हे शहरातील मरी माता मंदिराजवळ कारमध्ये बसलेले असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.
दरम्यान, पुणे शहरातील सांगवी परिसरातही एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिपक कदम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून दुचाकीवरुन आलेल्या दोघा अज्ञातांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा :
बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार; तटकरेंच्या दाव्याने खळबळ
सांगलीत लोकसभा निकालाआधीच महायुतीत उडाले खटके…
सावधान! गुगल मॅप वापरत असाल तर ; गमवावे लागतील प्राण, नेमकं काय घडलं