शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या(current political news) रणधुमाळीत मोठा झटका बसला आहे. ठाकरे यांचे प्रमुख शिलेदार आणि पदाधिकारी एम. के. मढवी यांना अटक करण्यात आली आहे. मढवी हे मुंबईतील ऐरोलीचे माजी नगरसेवक आहेत. ठाकरे गटाचे ते विद्यमान पदाधिकारीही आहेत. आता त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आज सकाळी रत्नागिरीत ठाकरे गटाच्या युवा सेना प्रमुख अजिंक्य मोर यांना तडीपारीची नोटीस देण्यात आली. यामुळे उद्धव ठाकरे यांना एकाच दिवसात डबल झटका बसला आहे.
एम. के. मढवी यांच्यावर खंडणी विरोधी पथकाकडून(current political news) अटक करण्यात आली आहे. ऐरोलीतील सेक्टर 5 मधील कार्यालयातून एम. के. मढवी यांना खंडणी विरोधी पथकाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यामुळे निवडणुकाच्या हंगामात ठाकरे गटाला हा मोठा झटका मानला जातो.
मुंबईतील एका ठेकेदाराकडून मढवी यांनी खंडणी मागितल्याचा आरोप आहे. ठेकेदाराकडे अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. याच प्रकरणामध्ये मढवी यांच्यावर खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली आहे. अटक करुन त्यांना आता ठाणे नेण्यात आल्याचं समजत आहे.
नवी मुंबई येथून एम के मढवी यांना ताब्यात घेण्यात आले होते. आता या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याच्या दृष्ि ठाण्यातील खंडणी विरोधी शाखेत नेण्यात आलं आहेत. एम के मढवी यांचे पत्नी आणि दोन मुलं देखील खंडणी विभागात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) युवा सेना जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस बजावली गेली आहे. ठाकरे गटाचे रत्नागिरी युवा सेनाप्रमुख अजिंक्य मोरे यांना ही तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. खेड पोलिस ठाण्यातील विविध सात गुन्ह्यांचा दाखला देत ही नोटीस त्यांना देण्यात आली आहे. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कारवाईच्या वेळेला प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.
हेही वाचा :
आजचे राशी भविष्य (28-04-2024).
शरद पवारांना पुन्हा धक्का; विश्वासू नेते भाजपच्या वाटेवर?
महाविकास आघाडीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल; कारवाईची शक्यता