खळबळजनक! मृत महिलेचा मृतदेह घेऊन सांगली शहरभर हिंडण्याचा प्रकार

गर्भपातासाठी कर्नाटकमध्ये गेलेल्या एका महिलेचा(women) गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर मृत्यूच्या दाखल्यासाठी मृत महिलेचा मृतदेह घेऊन सांगली शहरभर हिंडण्याचा प्रकार समोर आला आहे. सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित मृत महिलेच्या माहेरच्या 5 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे, ज्यामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे.

कोल्हापूरच्या हातकणंगले येथील सासर आणि सांगलीच्या मिरजेतील माहेर असणारी 32 वर्षीय महिलेची(women) गर्भलिंग चाचणी करण्यात आली होती. नंतर गर्भपात करण्याचा निर्णय माहेरच्या लोकांसह गर्भवती महिलेने घेतला. त्यांनी थेट कर्नाटक राज्यातल्या बागलकोट येथील महालिंगपूरमधील एक हॉस्पिटल गाठलं. मात्र गर्भपात करताना सदर महिलेचा मृत्यू झाला.

महिलेच्या मृत्यूचे कारण देण्यासाठी दाखला गरजेचा होता. पण संबंधितांच्याकडून देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे कुटुंबियांकडून मृत्यू दाखला मिळवण्यासाठी महिलेचा मृतदेह घेऊन सांगली आणि मिरजेत तीन तास मृतदेह घेऊन भटकंती करण्यात आली.

या दरम्यान सांगली पोलिसांना याची माहिती मिळाली. पोलिसांनी गाडीची चौकशी केली असता हा सर्व गर्भपात मृत्यूचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी डॉक्टरसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

हसन मुश्रीफांची माफी नाही, तर दंडवत घालीन, पण..!

शरद पवार गटात भूकंप, दिग्गज नेत्याचे सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप

मलायकाच्या ‘त्या’ कृत्याचं होतंय कौतुक; व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी म्हणाले…