उद्धव ठाकरेंनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीत मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंळातील(political circles) काही ज्येष्ठ नेत्यांना वगळण्यात आल्यामुळे नाराजीचा सूर आहे. ही नाराजी दूर होत नाही तोच उद्धव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे(political circles) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिट चर्चा देखील झाली, मात्र नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप समोर आलेलं नाही. विधानसभा विरोधी पक्षनेत्यासंदर्भांत चर्चा करण्यासाठी ही भेट झाल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणीस यांना शुभेच्छा देखील दिल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर, ही दोघांमधली पहिलीच भेट ठरली आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे देखील आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. भाजप शिवसेना युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ही दुसरी अचानक झालेली भेट आहे. याआधी विधान परिषद निवडणुकीवेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानसभेत एकाच लिफ्टमध्ये गाठभेट झाली होती. त्यावेळीही राज्यात चर्चांना उधाण आलं होतं.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला न भुतो न भविष्यती विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबई येथे पार पडला. या शपथविधीसाठी माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून निमंत्रण दिले होते.

मात्र विरोधकांमधून कोणताही नेता या सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. मात्र उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील अनेक नेते शपथविधीला हजर राहिले नाहीत. यानंतर आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि सचिन अहिर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भेटीबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जाती, अशी महायुती सरकारकडून अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त ही निवडणूक कशी जिंकली हे प्रश्न आहेतच. त्याबाबत यापुढे जनतेत जाऊन आवाज उठवू.”

हेही वाचा :

इचलकरंजी नगरचना विभागाचा भोंगळ कारभार

संसदेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयकाला ‘इतकी’ मते विरोधात पडली!

शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीचं होणार ‘थ्रीडी स्कॅनिंग’; शुक्रवारी दुपारी मंदिर 3 तास दर्शनासाठी बंद