केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370 कलम प्रश्न माझ्यावर भिरकावला आहे. अहो…अमित शाह तुम्ही विसरताय की शिवसेनेने तुम्हाला 370 कलम हटवताना पाठिंबा दिला होता. हे तुम्ही कसं काय विसरताय?, असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. मुंबईतील बीकेसीच्या प्रचारसभेत(meeting) उद्धव ठाकरे बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं खोटं हिंदुत्व आहे. माझ्या मनात गुजराती समाज यांच्याशी काहीही भांडण नाही. मुंबईत राहणाऱ्या गुजराती बांधवांना कधीही त्रास झाला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. बुलेट ट्रेन स्टेशन धारावीच्या शेजारी कसं काय? बुलेट ट्रेनने गुजराती लोकांना इथं आणायचं आहे.
मुंबई मारण्यासाठी हे नीती आयोगच्या ताब्यात देत आहेत, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. भाजप आता संकरित झालं आहे कारण वेगवगेळ्या विचाराचे बीज त्यामध्ये आहे. ओरिजनल कुठे आहे. सगळीकडे बाडगे आहेत, कोकणातसुद्धा बाडगा आहे. आई मेली तरी चालेल, यांना फक्त खुर्ची हवी आहे. बाकी यांना कशाशी घेणं देणं नाही, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी(meeting) केला.
बाळासाहेब ठाकरेंचा यांना फोटो लावावा लागतोय. आता बाळासाहेबांचा फोटो लावून मतांची भीक मागत आहेत. संभाजीनगरमध्ये गद्दार निवडून आला. मोदी-शाह यांना सांगतोय कितीही शिवसेना फोडायचा प्रयत्न करा काही होणार नाही. मोदीजी तुम्ही हरलेला आहात कारण आता तुमच्याकडे चेहरा नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच राज्यात महिला सुरक्षित नाही. मात्र यांच्या चमच्यांना देखील संरक्षण आहे. आपल्याला अंधार संपायचं असेल तर धगधगती मशाल आपल्याला हातात घ्यावी लागेल, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं.
राज्यात सरकार बदललं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि सरकार नाही बदललं तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी यावेळी अमित शाह यांची मिमिक्री देखील केली. मला अमित शाह म्हणाले उद्धवबाबू…हा बोलो अमितशेठ…मला बाबू म्हटलं तर आपल्याला देखील आदरातिथ्य करायला हवं, म्हणून अमितशेट म्हणतोय…अमितशेट म्हणाले, ज्यांनी 370 कलम हटवण्याला विरोध केला, त्यांच्यासोबत उद्धवबाबू बसले आहेत.
मी म्हटलं अमितशेठ 370 कलम हटवताना ज्या पक्षांनी तुम्हाला पाठिंबा दिला, त्यामध्ये शिवसेना पक्ष देखील होता, हे तुम्ही कसे विसरलात?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच जर तेल वैगरे लावा डोक्याला बरं असतं, म्हणजे केसही येतील, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
हेही वाचा :
‘हिच ती 3 सेकंदांची Clip ज्यासाठी धानुषने मागितले 10 कोटी’
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री..; ‘या’ नेत्याचा मोठा दावा
लग्नसराई सुरु होताच सोन्याचे भाव घसरले!