मुंबई : आगामी निवडणुका (election)लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात महत्त्वपूर्ण आश्वासन दिले आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या पक्षाचे सरकार सत्तेत आल्यावर जुन्या पेन्शन योजनेची पुन्हा अंमलबजावणी केली जाईल.
ठाकरे यांनी पेन्शन योजना रद्द केल्याबद्दल सध्याच्या सरकारवर टीका करत म्हटले की, “जुनी पेन्शन योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, आणि ही योजना पुन्हा लागू करण्याचे आमचे प्राधान्य राहील.”
ठाकरे यांच्या या घोषणेने सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
हेही वाचा:
सांगलीमध्ये मिरवणुकांमध्ये लेझर लाईटला बंदी; पोलिस प्रशासनाचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
राज्यात पुन्हा राजकीय उलथापालथ होणार; अजित पवारांच्या मनात नक्की चाललंय काय?
ST महामंडळाचा मोठा निर्णय; प्रवासात अडचण आल्यास थेट आगारप्रमुखांना फोन, नंबर झळकणार