मुंबई: “छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी सुरत लुटली. पण हे दोन ठग हे महाराष्ट्र लुटत आहेत. महाराष्ट्राच्या लुटीचा पैसा वापरुन जाहिरात करत आहेत.” अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर (Political news)निशाणा साधला. मुंबईत मुंबईतील शिवाजी मंदिर येथे आयोजित राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे(Political news) म्हणाले, “ या देशासाठी बलिदान देणारे अनेक होऊन गेले, आजही आहेत, मग ते जात-पात, धर्माने कोणीही असले तरी ते आमचे आहेत. हे आमचे हिंदुत्त्व आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या लक्षात आले बोगस हिंदुत्त्वाचा बुरखा घालून हे लोक माझ्या देशाचे संविधान बदलू पाहत आहेत. म्हणून मी माझ्या भाषणाची सुरूवात जमलेल्या माझ्या देशबांधवांने अशी केली.पण त्यावरही टीका करण्यात आली. देशभक्तांमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वजण येतात. महाराष्ट्र धर्म रक्षणासाठी जो कोणी माझ्या बरोबर येईल, तो माझा आहे. मग तो मुस्लिम असो, ख्रिश्चन असो कुणीही असो.”
“ते नवा महाराष्ट्र घडण्याची अपेक्षा करत आहेत. पण नवा महाराष्ट्र घडवण्याची गरजच नाहीये. माझ्या महाराष्ट्राचं स्वत्व टिकवा बाकी काही नको. असे कोणतही क्षेत्र नाही जिथे महाराष्ट्र पुढे नाही,आज प्रत्येक क्षेत्रात महाष्ट्र पुढे आहे. असा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे असेल तर का म्हणून आम्ही तुमची गुलामगिरी करायची, कोण लागता तुम्ही आमचे, दुर्दैवाने तुम्ही तिकडे बसलात, ते आमचेच पाप आहे. पण जेव्हा गरज होती. त्यावेळी तुम्ही आमचा खांदा वापरलात, हा मतलबीपणा तुमचा लपून राहिला नाही. कोण आहात तुमही, तुम्हाला देशातली लोकशाही का संपवायची आहे. जर लोकशाही नसती तर तुम्ही निवडून आला असता का, पण निवडून आल्यावर तुम्ही लोकशाही संपवण्याची भाषा करत आहात, तशी पावलेही टाकत आहात. ही पावले आता लोकांनी ओळखली पाहिजे.” असंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
“माझे लोक मला नेहमी म्हणत असतात, महाविकास आघाडीत वाद होणार नसेल तर… पण आजही सांगतो, काँग्रेस- राष्ट्रवादीने आज मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी आजा त्याला पाठिंबा जाहीर करतो. मुळात महाराष्ट्र प्यारा आहे. मला महाराष्ट्राचं हित साधायचं आहे. मी मुख्यमंत्री होईन, पुन्हा येईन पुन्हा येईन अशी स्वप्ने मला पडत नाहीयेत, मला तेव्हाच यायचं नव्हतं मग मी पुन्हा का येईन,पण महाराष्ट्र वाचावण्यासाठी मला जे काही करता येईल ते केल्याशिवाय मी राहणार नाही, हा माझा निर्धार आहे.”असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“माझा आणि तुमचा स्वार्थ एवढाच आहे की. माझा महाराष्ट्र आणि पुढच्या दोन पिढ्या या दोन ठगांच्या गुलामगिरीत हा महाराष्ट्र जगू देणार नाही. आम्ही गुलामगिरी नाही पत्करणार. हिंदुत्त्व हे हिंदुत्त्वच आहे, त्यात काळानुसार काही भूमिका घ्याव्या लागतात. मला शेंडी जाणव्याचे हिंदुत्त्व मान्य नाही, हे माझं नाही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आहे. मला देवळात घंटा बडवणारे हिंदुत्व नकोय. ”बुरसटलेले हिंदुत्व मान्य नाही. हेही बाळासाहेबांचे वाक्य आहे. जो लढा माझ्या आजोबांनी दिला, तोच वडिलांनी दिला. लोकांची घरे पेटवणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, तर चूल पेटवणारे हिंदुत्व आहे. भाजपला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही.”
हेही वाचा:
उत्तर भारताचा कल कही खुशी, कही गम!
बिबट्या बसच्या खिडकीतून शिरत होता अन् पुढं जे झालं…Video
शुटिंगदरम्यान मोठी दुर्घटना, गायिका जखमी; भिंती कोसळल्या अन्…; VIDEO व्हायरल