उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा कट महाविकास आघाडी(political news) करत आहे. त्यांना आतातरी बुध्दी यायल हवी अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी केली. 2024 च्या विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा उध्दव ठाकरे पूर्णपणे नेस्तनाबूत झालेले दिसतील असेही योगेश कदम म्हणाले.
उद्धव ठाकरेंचा आजारपणाचा फायदा राजकारणासाठी(political news)करण्याचा प्रयत्न सफल होणार नाही. त्यांना दीर्घायुष्य लाभो असेही योगेश कदम यावेळी म्हणाले. रवींद्र चव्हाण हे महायुतीचे नेते आहेत, त्यांना प्रचाराला नक्की बोलणार आहे, आले तर ठीक नाही आले तर आम्ही सक्षम आहोत असे योगेश कदम म्हणाले. रवींद्र चव्हाण यांच्याबाबत प्रश्न विचारला असता योगेश कदम यांनी उत्तर दिले.
निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असल्याचे योगेश कदम म्हणाले. पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या जोरावर जिंकण्याचा आम्हाला विश्वास असल्याचे कदम म्हणाले. दापोलीत भाजप आणि शिवसेनेत वाद नाहीत. 2019 ला देखील आता विरोध करणाऱ्या लोकांनी माझ्या विरोधात काम केलं. तळागाळातील भाजपचे कार्यकर्ते माझ्यासोबत असून महायुतीचे काम करतील असे योगेश कदम यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरेंना आतातरी बुध्दी यायल हवी. उध्दव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा कट मविआ करत असल्याचे कदम म्हणाले.
कोकणातील प्रमुख आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांपैकी एक म्हणजे रत्नागिरी. तसं म्हटलं तर राजकीयदृष्ट्या शांत, पण अधिक उलथापालथी होत असलेला हा जिल्हा. अणुऊर्जा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प, संभाव्य बॉक्साईट उत्खनन यासारख्या प्रकल्पांमुळे प्रसिद्ध असलेला हा जिल्हा. मासेमारी आणि हापूस आंब्यावर देखील याचं मुख्य अर्थकारण.
शिवाय, पर्यटनासाठी मिळणारी पर्यटकांची पसंती देखील नजरअंदाज करून चालणार नाही. स्वातंत्र्यानंतर समाजवाद, काँग्रेस आणि सद्यस्थितीत शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून रत्नागिरी जिल्ह्याची ओळख. राज्याच्या राजकारणात जिल्हा फारसा केंद्रस्थानी नसला तरी मुंबई, कल्याण, ठाणे या ठिकाणी होणाऱ्या किंवा केल्या जाणाऱ्या राजकारणावर कोकणी माणसाचा प्रभाव स्वाभाविकपणे दिसून येतो.
त्यामुळे या जिल्ह्यातील विविध भागांमधून मोठ्या शहरांमध्ये होणारं स्थालांतर देखील लक्षणीय. मुंबईसारख्या महानगर क्षेत्रात होणारं राजकारण, त्यावर कोकणी माणसाचा पडणारा प्रभाव, मोठे प्रकल्प यामुळे सध्या या जिल्ह्याला देखील अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. पण, लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात उलथापालथी होताना दिसून येत आहेत.
हेही वाचा:
मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिटेन करणार की नाही?
सलमान खानचा गेम करण्यासाठी बिश्नोई गँगनी दिली ‘इतक्या’ लाखांची सुपारी!
मोबाईल काढून घेतला म्हणून 14 वर्षांच्या मुलाने आईवर केला हल्ला; घरातील खिडकीच्या काचा फोडल्या अन्…