सांगलीतून विशाल की चंद्रहार पाटील? तडजोडीस उद्धव ठाकरेंचा नकार, ‘मविआ’कडून आज घोषणा

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने जाहीर केलेली डबल महाराष्ट्र(political consulting firms) केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागे घ्यावी किंवा मैत्रीपूर्ण लढतीला मान्यता द्यावी, यासाठी सुरू असलेले काँग्रेसचे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत. प्रदेश आणि राष्ट्रीय काँग्रेस नेत्यांच्या प्रयत्नांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धुडकावून लावले आहे.

त्यामुळे पाटील यांच्या नावाची महाविकास (political consulting firms)आघाडीचे उमेदवार म्हणून घोषणा होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज (ता. ९) आहे. काँग्रेस पक्षाकडून शेवटपर्यंत सांगलीची जागा मिळविण्यासाठी प्रयत्न झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांची भेट मागितली होती.

ठाकरे गटाकडून सांगलीच्या विषयावर प्रदेश नेत्यांशी कोणतीही चर्चा होणार नाही. आम्ही राष्ट्रीय नेत्यांशी याबाबत चर्चा केली आहे, असा निरोप दिला. ठाकरेंनी भेट नाकारली याचा स्पष्ट अर्थ त्यांनी कोणत्याही तडजोडीला तयारी नसल्याचे संकेत दिले. त्यामुळे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत. या स्थितीत होत असलेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीला काँग्रेस नेते हजर राहणार आहेत.

महाविकास आघाडीत सांगली, भिवंडी व मुंबईतील काही जागा वाटपावरून अंतर्गत मतभेद सुरू होते. त्यामध्ये सांगलीवरून शिवसेना व काँग्रेसमध्ये प्रचंड ताणाताणी झाली. शिवसेनेने सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी थेट दिल्ली गाठून सांगलीची जागा सोडू नये, अशी मागणी केंद्रीय नेत्यांकडे केली होती. हा चेंडू सोनिया गांधी यांच्या कोर्टात असल्याचे सांगण्यात येत होते. ठाकरे गटाकडून याबाबत प्रदेश नेत्यांशी कोणतीही चर्चा न करता राष्ट्रीय नेतृत्वाशी चर्चा केली जात होती.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सांगलीची जागा सोडणार नसल्याचे शिवसेनेला स्पष्ट सांगितले होते. या वादाच्या काळातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी तीन दिवस सांगलीचा दौरा केला. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला लक्ष्य केले. या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होत आहे. या बैठकीत राज्यातील ४८ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. त्यात सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.

हेही वाचा :

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व

२०२२ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय, २ वर्षांनंतर घटस्फोटाचा अर्ज! धनुष- ऐश्वर्याबाबत मोठी अपडेट

मनोरंजन जोरदार, तुम्ही आहात का तय्यार ? एअरटेल एक्स्ट्रीम फायबरसोबत मिळेल शानदार एंटरटेनमेंट