यमराजही काकांना घाबरत असेल…! सिलेंडरला आग लावून काका करू लागले काही असं…Video

सोशल मीडियावर रोज अनेक कारनामे व्हायरल होत असतात. लोक इथे अनेक विचित्र घटना अनोखे जुगाड शेअर करत असतात. यातील दृश्ये नेहेमीच आपल्याला थक्क करतात. इथे बऱ्याचदा अशा काही गोष्टी व्हायरल होतात ज्यांचा आपण स्वप्नातही कधी विचार केला नसावा. सध्या देखील असाच एक प्रकार इथे व्हायरल(viral) झाला आहे जो पाहून तुम्ही हादरल्याशिवाय राहणार नाही. यातील दृश्ये पाहून तुम्हाला हसावं कि रडावं ते समजणार नाही. नक्की व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे प्रकार व्हायरल(viral) होत असतात. सध्या इथे एका काकांचा अनोखा कारनामा व्हायरल झाला आहे. काकांचा हा जुगाड इतका भयानक आहे की पाहूनच तुम्हाला धडकी भरेल. आता आपणा सर्वांना ठाऊक आहे की सर्वत्र थंडीचे वातावरण पसरले आहे अशात अनेकजण या थंडीच्या वातावरणात शेकोटी करून थंडीचा आनंद लुटतात.

व्हायरल व्हिडिओत हे काकादेखील शेकोटीचा आनंद लुटत आहेत मात्र एका अनोख्या अंदाजात. मात्र ही शेकोटी कोणत्या लाकडाची नसून सिलेंडरची आहे… होय तुम्ही बरोबर ऐकले. व्हिडिओत काक गॅस सिलेंडरला आग लावून त्याची शेकोटी करता दिसून आले.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काकांची खतरनाक स्टाइल पाहण्यासारखी आहे. व्हिडिओमध्ये काका खुर्चीवर आरामात बसले आहेत आणि त्यांच्यासमोर गॅस सिलिंडर ठेवलेला आहे. सिलिंडरच्या नोझलमधून गॅस गळत असून, त्यात काकांनी आग लावली आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी धोकादायक परिस्थिती असूनही हात पाय गरम करताना काका आरामात कोणाशी तरी बोलत आहेत. हा व्हिडिओ कोणालाही आश्चर्यचकित करू शकतो, कारण गॅस सिलिंडरमध्ये थोडीशी ठिणगी पडल्याने मोठा अपघात होऊ शकतो. काकांचा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक आता यातील दृश्ये पाहून थक्क होत आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ @farhan_siddiqi_15 नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हे वृत्त लिहिपर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. त्याच वेळी, व्हिडिओला 2.5 लाखांहून अधिक लाईक्स देखील मिळाले आहेत. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मागे पेट्रोल देखील ठेवले आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यमराजांसोबत रोज उठणे बसणे आहे काकांचे”.

हेही वाचा :

खुशखबर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल स्वस्त…

किसिंग वादानंतर गायक उदित नारायण यांनी व्यक्त केली भारतरत्नची इच्छा

लाथ नव्हे, गोळ्या घालायला पाहिजे होत्या – चंद्रहार पाटलांचे वादग्रस्त वक्तव्य