देशातील २१ ‘आयआयएम’(iim)पैकी केवळ २० टक्के विद्यार्थ्यांना उन्हाळयात नोकऱ्या मिळाल्या आहेत.
नवी दिल्ली : भाजपने लादलेली बेरोजगारी(iim) हा या लोकसभा निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा आहे, असे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी व्यक्त केले. तरुणांना नोकऱ्या शोधण्यात समस्या येत आहेत आणि देशासमोर लोकसांख्यिकीचे दु:स्वप्न उभे आहे, असा इशाराही त्यांनी दिला.‘एक्स’ या समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये खरगे यांनी विश्वास व्यक्त केला की, काँग्रेसच्या ‘युवा न्याय’अंतर्गत ‘पहिली नोकरी पक्की’ हमीमुळे काम आणि शिक्षणादरम्यानचे अडथळे दूर होतील, त्यामुळे तरुणांच्या कारकीर्दीसाठी नवीन संधी निर्माण होतील.
देशातील ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’ या अग्रणी शैक्षणिक संस्थांचे उदाहरण देत खरगे यांनी लिहिले की, ‘‘१२ ‘आयआयटी’मधील जवळपास ३० टक्के विद्यार्थ्यांना नियमित नोकऱ्या मिळत नाहीत. देशातील २१ ‘आयआयएम’पैकी केवळ २० टक्के विद्यार्थ्यांना उन्हाळयात नोकऱ्या मिळाल्या आहेत. ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’मध्ये ही परिस्थिती असेल तर भाजपने देशभरातील युवकांचे भविष्य कसे उद्ध्वस्त केले आहे त्याची कल्पना करता येईल.’’ मोदी सरकारच्या कारकीर्दीत २०१४पासून तरुणांमधील बेरोजगारीचा दर तिप्पट झाला आहे, अशी टीका खरगे यांनी केली. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने प्रसिद्ध केलेल्या भारत रोजगार अहवालात असे दिसून येते की, भारतात दरवर्षी ७० ते ८० लाख नवीन मजूर तयार होतात, पण २०१२ ते २०१९ या कालावधीत रोजगारीत जवळपास शून्य वाढ झाली, असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा :
सनी लियोनी हिचा पहिला साखरपुडा, ‘तो’ पुरुष आणि बरंच काही…
बच्चू कडू यांचा महायुतीवर आणखी एक ‘प्रहार’, सरळ काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा
बॉसच्या त्रासाला कंटाळले कर्मचारी, चक्क गुंडांना दिली सुपारी! हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल