राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात अनेक चढ उतार दिसत आहेत. उष्णतेच्या लाटेनंतर हवामान विभागाने सोलापूर, सिंधुदुर्ग, सांगली जिल्ह्याला अवकाळी पावसाचा अलर्ट दिला होता. मागील दोन दिवसांपासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने(rain) हजेरी लावली.

अवकाळी पाऊस(rain) आणि वादळी वाऱ्याचा फटका जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला असून टरबूज बागा मातीमोल झाले आहेत. सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अवकाळी पावसाने काही भागांमध्ये हजेरी लावली. सांगलीत मुसळधार पावसाने वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाला. या तिन्हीही जिल्ह्यात बागायतदारांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.
मागील दोन दिवसापासून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला बसलाय. बार्शी तालुक्यातील माळेगाव शिवारात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सुभाष घोडके या शेतकऱ्याची 1 हेक्टर द्राक्षबाग आडवी झालीय, त्यामुळे साधारण 15 ते 20 लाख रुपयांच नुकसान झालंय. तर याच अवकाळी पावसामुळे बार्शी तालुक्यातील राळेरास मधील टरबूज बाग मातीमोल झालीय. मोतीबुवा गोसावी या शेतकऱ्याने साधारण एक एकर परिसरात लावलेला टरबूज अक्षरशः जमिनीला मिळालाय. एकीकडे सोलापूर जिल्ह्यातील तापमान चाळीशीच्या पार जातं असल्याने फळपिकांना तग धरणे कठीण झाले होते. त्यातच अवकाळीने गोसावी यांची टरबूज बाग नेसस्तनाबूत केलीय. आता हे शेतकरी सरकारकडे मदितीची अपेक्षा करतायत.
सांगलीत महिलेचा वीज पडून मृत्यू
सकाळी शेतामध्ये गेल्या असता अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.जोराचा वारा व वादळ सुटल्याने त्या घरी जाण्यास निघाल्या असता त्यांच्या अंगावर वीज कोसळली व त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सांगलीत काल वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला होता.
रब्बी पिकं गहू, हरभरा, ज्वारी आणि उर्वरित द्राक्ष पिकांवर मात्र अवकाळीमुळे संकट ओढावलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. कराड-पाटण तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले. वर्षातील पहिला अवकाळी पाऊस होता. लाव वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लावल्याने कराड आणि पाटण शहरातील व्यापाऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली.
हेही वाचा :
इचलकरंजी : माजी नगरसेवकासह तिघांना खंडणी प्रकरणी अटक
ठाकरे गटाला मोठं खिंडार, ‘या’ बड्या नेत्यांचा आज शिंदेसेनेत पक्षप्रवेश
प्रशांत कोरटकर याचा पहिला अंक समाप्त…!