‘या’ जगप्रसिद्ध गायकाचा दुर्दैवी अंत, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू

जगप्रसिद्ध इंग्लिश पॉप बँड वन डायरेक्शनचा माजी सदस्य गायक लियाम पायने याचा मृत्यू(death) झालाय.इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गायकाचा मृत्यू झाला आहे. या बातमीमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूमागे सोशल मीडियावर चाहते वेगवेगळे दावे करत आहेत. त्यामुळे सध्या फक्त आणि फक्त गायक लियाम पायने याचीच चर्चा रंगली आहे.

वयाच्या 31 व्या वर्षी लियामने जगाचा निरोप घेतला. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथील हॉटेलच्या बाहेर गायकाचा मृतदेह आढळला आहे. तो ड्रग्सच्या प्रभावाखाली होता, असंही म्हटलं जातंय. तर, काही मीडिया रिपोर्टमध्ये त्याचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू(death) झाल्याचं बोललं जातंय.

लियाम ड्रग्सच्या नशेत असताना तोल जाऊन तो इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अर्जेंटिनामधील एका हॉटेलच्या बाहेर ड्रग्स आणि दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी लगेच या घटनास्थळी धाव घेत तपास केला. यानंतर हा मृतदेह लियाम पायनेचा असल्याचं स्पष्ट झालं.

या वृत्तामुळे जगभरात हळहळ व्यक्त केली जातेय. लियाम पायनेच्या मृत्यूच्या बातमीने त्याच्या कुटुंबियांसह चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्याच्या मृत्यूमागे काहीतरी वेगळंच कारण असू शकतं, असा दावा चाहते सोशल मीडियावर करत आहेत.

दरम्यान, लियाम पायने प्रसिद्ध ब्रिटीश गायक होता.वन डायरेक्शन पॉप बँडमुळे त्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली होती. 2010 मध्ये एक्स फॅक्टर शोमध्ये हा बँड तयार झाला होता. या बँडमध्ये लियाम पायनेसह हॅरी स्टाईल्स, झायन मलिक, नायल होरान आणि लुइस टॉमिलसन हे सदस्य होते. 2016 मध्ये या बँडमधील सर्वजण वेगळे झाले.

हेही वाचा:

स्वामींच्या कृपेने आज ‘या’ राशींच्या मनोकामना पूर्ण होणार!

जरांगे पाटलांनी निवडणूक लढवण्याचे संकेत देताच तब्बल 800 इच्छुकांचे आले अर्ज

मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर!