केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा 2024-25 चा अर्थसंकल्प(free tax filing) सादर केला आहे. मंगळवारी (23 जुलै) सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात वित्त अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मोदी 3.0 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पगारदार वर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. कर स्लॅबमध्ये बदल करण्याच्या मध्यमवर्गाच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला सरकारने दिलासा दिला आहे.
संसदेत अर्थसंकल्प(free tax filing) सादर करताना, अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की सरकारकडून नवीन कर प्रणाली सुलभ केली जात आहे. दोन तृतीयांश करदाते नवीन कर प्रणाली अंतर्गत आले आहेत. नवीन कर प्रणाली अंतर्गत, मानक वजावट मर्यादा 50 हजार रुपयांवरून 75000 रुपये करण्यात आली आहे. या बदलामुळे सरकारचे 37000 कोटी रुपयांचे नुकसान होणार असल्याचे ते म्हणाले. सरकारने केलेल्या बदलांचा थेट फायदा ४ कोटी करदात्यांना होणार आहे.
याशिवाय, अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणालीच्या कर स्लॅबमध्येही मोठे बदल केले आहेत. नवीन बदलानुसार, नवीन कर प्रणालीमध्ये 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर भरावा लागेल. 3 ते 7 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 5 टक्के कर लागेल. 7 ते 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर भरावा लागेल. 10 ते 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर 15 टक्के कर भरावा लागेल. 12 ते 15 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जाईल. 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना 30 टक्के कर भरावा लागेल.
जुन्या करप्रणालीत अर्थमंत्र्यांनी जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही. स्टँडर्ड डिडक्शनबाबत जुन्या नियमात कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत फक्त 50,000 रुपयांची मानक वजावट मिळेल. याशिवाय, आरोग्य विमा प्रीमियम आणि 80C बाबत सरकारकडून कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
नव्या करप्रणालीचा पर्याय निवडणाऱ्या पगारदार वर्गाला सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी नवीन कर प्रणाली अंतर्गत आयकर स्लॅबमध्ये बदल केले आहेत. पूर्वीची 50,000 रुपयांची मानक वजावट वाढवून 75,000 रुपये करण्यात आली आहे. पूर्वीप्रमाणेच 0 ते 3 लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. यानंतर ३ ते ७ लाख रुपयांवर ५ टक्के कर भरावा लागेल. 7 ते 10 रुपयांच्या उत्पन्नावर 10 टक्के कर भरावा लागेल. 10 ते 12 लाखांच्या उत्पन्नावर 15 टक्के, 12 ते 15 लाखांच्या उत्पन्नावर 20 टक्के आणि 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर भरावा लागेल.
जुन्या कर प्रणालीमध्ये 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागत नाही. यानुसार करदात्यांना २.५ लाख ते ५ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर ५ टक्के दराने कर भरावा लागेल. वार्षिक उत्पन्न 5 लाख ते 10 लाख रुपये असेल तर 20 टक्के दराने कर भरावा लागेल. परंतु 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर लावला जाईल. परंतु या अंतर्गत तुम्हाला अनेक प्रकारचे कर लाभ मिळतात.
हेही वाचा :
खुशखबर! आता सर्वसामान्यांना मिळणार हक्काचं घर…
श्रीलंका दौऱ्याआधी भारताच्या अष्टपैलू खेळाडूने उरकला साखरपुडा
टोमॅटोने मोडले सफरचंदाचे रेकॉर्ड, गृहिणींनो आता बेतानेच वापरा टोमॅटो, एक किलो तब्बल…