रायगडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे एका अल्पवयीन(light) मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटना समोर आल्यानंतर सर्वांनाच जबर धक्का बसला. हे प्रकरण आता पोलीस स्थानकात पोहोचलं असून पोलीस याची चौकशी करत आहेत. कसा आणि कुठे घडला हा प्रकार? जाणून घेऊया.
रायगडमध्ये एका अल्पवयीन(light) मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. धक्कादायक म्हणजे यातील आरोपीदेखील 2 अल्पवयीन मुले आहेत. माणगावच्या जावळी येथील मागासवर्गीय निवासी शाळेतून हा गंभीर प्रकार समोर आलाय. इतक्या लहान वयात लैंगित अत्याचार करण्यापर्यंतचे विचार मुलांच्या मनात येतात कसे? ही घटना घडेपर्यंत शिक्षक, इतर कर्मचारी कुठे असतात? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतायत.
आपल्यावर अत्याचार झाल्याचा प्रकार पीडित विद्यार्थ्याने शिक्षकांना सांगितला.यानंतर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान तीनही मुलांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर माणगाव रेल्वेस्थानका जवळ भरधाव टेम्पोने मोटार सायकलला धडक दिली. रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात मोटार सायकल स्वार जागीच ठार झाला. यज्ञेश उभारे असे मृत तरुणाचे नाव असून तो माणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रभाकर उभारे यांचा मुलगा आहे.
हेही वाचा:
भाजप पदाधिकाऱ्यावर चाकूने हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ
200 कोटींच्या फसवणुकीत सुकेश चंद्रशेखरला दिलासा; जामीन मंजूर
टीम इंडियात ‘या’ पाच दिग्गजांसाठी दरवाजे बंद, आयपीएल मध्येही ‘गेम ओव्हर’