यूपीआय(UPI) पेमेंट सिस्टमने भारतात डिजिटल पेमेंटचे सर्व पॅरामीटर्स बदलले आहेत. अशा परिस्थितीत आता कोणीही पेमेंटच्या या बदलत्या जगात कोणीही मागे राहू इच्छित नाही. यूपीआय मॉडेलमध्ये कंपन्यांकडे कमाईचा कोणताही ऑप्शन नाही. असे असतानाही लवकरच देशातील ५० नवीन पेमेंट ॲप्सवर यूपीआय सर्व्हिस सुरू केली जाऊ शकते. ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’कडून (एनपीसीआय) याबाबत मोठी घोषणा करण्यात आली आहे.
यूपीआय(UPI) पेमेंट सर्व्हिस मॅनेज करणारी सरकारी कंपनी ‘नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’चे (एनपीसीआय) वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, मर्चेंट डिस्काउंट रेट म्हणजेच एमडीआर (पेमेंट सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत) नसतानाही देशातील ५० नवीन थर्ड पार्टी ॲप्स रिअल-टाइम पेमेंटसाठी यूपीआय सर्व्हिस स्विकारण्यास इच्छुक आहेत.
एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ दिलीप आबसे यांच्या म्हणण्यानुसार, यूपीआयमध्ये इनकम मॉडेल नसल्यामुळे गेल्या काही वर्षांत कंपन्या या सिस्टमचा अवलंब करण्यास टाळाटळ करत होत्या. परंतु गेल्या एका वर्षात नवीन कंपन्यांचा यूपीआय पेमेंट सर्व्हिस सुरू करण्यासाठी कल वाढला आहे. जवळपास ५० नवीन थर्ड पार्टी पेमेंट ॲप्स आता मार्केटमध्ये एन्ट्री करू पाहत आहेत. असे दिलीप आबसे यांनी सांगितले आहे.
सध्या देशात यूपीआय व्यवहार पूर्णपणे मोफत आहेत. फिनटेक कंपन्या आणि बँका त्याच्या प्रक्रियेचा खर्च उचलतात. तसेच, भविष्यातही यूपीआय पेमेंट सर्व्हिस मोफत राहील, असे एनपीसीआयचे एमडी आणि सीईओ दिलीप आबसे यांनी सांगितले आहे.
मर्चेंट डिस्काउंट रेट (एमडीआर) हे खरे तर एक शुल्क आहे. जे कंपन्या पेमेंट रिसिव्ह करण्यासाठी त्यांची सर्व्हिस वापरणाऱ्या व्यापाऱ्यांकडून आकारतात. क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या उत्पन्नाचा हा मुख्य स्त्रोत आहे. यूपीआय पेमेंटमध्ये एमडीआर सुविधा नाही, कारण ती पीअर ३ पीअर नेटवर्कवर काम करते. दरम्यान, काही पेमेंट कंपन्यांनी साउंडबॉक्स, डिजिटल क्यूआर कोड आणि पीओएस सिस्टम विकसित करून यूपीआय पेमेंटसाठी एमडीआरचा पर्याय शोधला आहे.
हेही वाचा:
राधिका आपटे लवकरच होणार आई, अभिनेत्रीने फ्लॉन्ट केला क्युट बेबी बंप!
सोन्याची जोरदार आघाडी, 10 ग्रॅमसाठी आता मोजा ‘इतके’ रुपये
मोठी बातमी : चर्चित IRS अधिकारी समीर वानखेडे सुरू करणार राजकीय इनिंग