देशात UPI व्यवहार (online payment)झपाट्याने वाढले आहेत. स्मार्टफोन वापरणारी जवळपास प्रत्येक व्यक्ती लहान-मोठे व्यवहार आणि पैसे हस्तांतरणासाठी UPI वापरत आहे. मोठ्या दुकानदारांपासून ते रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या दुकानांपर्यंत त्यांनी क्यूआर कोडद्वारे पैसे भरण्याची ही पद्धत अवलंबली आहे. मात्र आता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने ही समस्या दूर केली आहे. आजपासून म्हणजेच 16 सप्टेंबरपासून यूपीआयच्या रोजच्या व्यवहारात वाढ झाली आहे.
NPCI ने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशांनुसार, आजपासून म्हणजेच 16 सप्टेंबरपासून अनेक ठिकाणी UPI व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने 8 ऑगस्ट रोजी पतधोरण बैठकीनंतर UPI व्यवहारांची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली होती.
या संदर्भात NPCI ने सर्व UPI ॲप्स(online payment), पेमेंट सेवा प्रदाते आणि बँकांना देखील कळवले आहे. त्यांना नवीन सूचनांनुसार त्यांची यंत्रणा अद्ययावत करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे.
NPCI च्या नवीन नियमांनुसार तुम्ही आजपासून कर भरण्यासाठी UPI द्वारे 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकता. यामध्ये तुम्ही रूग्णालय बिल, शैक्षणिक शुल्क, IPO आणि RBI च्या किरकोळ थेट योजनांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार अगदी सहज करू शकता. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे ही वाढलेली मर्यादा प्रत्येक व्यवहारात वापरली जाणार नाही.
यापूर्वी, NPCI ने डिसेंबर 2021 आणि डिसेंबर 2023 मध्ये UPI व्यवहार मर्यादा बदलली होती. याशिवाय एकाच खात्यातून अनेक लोकांकडून व्यवहार करण्याची सुविधा UPI सर्कलच्या माध्यमातून देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र सध्यातरी वर नमूद केलेले व्यवहार वगळता अन्य सर्व प्रकारच्या UPI ट्रान्जेक्शनवर एका दिवसासाठी तब्बल एक लाख रुपयांची ट्रान्जेक्शन लिमीट आहे.
हेही वाचा:
सत्तेत आल्यास जुनी पेन्शन योजना लागू करणार; उद्धव ठाकरे यांचे आश्वासन
गुड न्यूज! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
कोल्हापूर हादरले! 73 वर्षांच्या नराधमाकडून नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, क्लासमध्ये बोलवलं अन्…