उर्फी जावेदनं उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली;

बॉलिवूड अभिनेत्री (actress)तृप्ती डिमरी ही ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटानंतर सतत चर्चेत असते. या चित्रपटातून मिळालेल्या यशानंतर तिनं अनेक चित्रपट केले. खरंतर या चित्रपटानंकर तिनं ‘बॅड न्यूज’, ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीयो’ आणि ‘भूल भुलैया 3’ या तीन चित्रपटांमध्ये दिसली. या चित्रपटांमध्ये सगळ्यात शेवटी ती कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया 3’ मध्ये दिसली. दरम्यान, आणखी एका गोष्टीला घेऊन ती चर्चेत आहे आणि ते म्हणजे तृप्तीचा डान्स. ज्यामुळे उर्फी जावेदनं देखील टीका केली आहे.

उर्फीनं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत उर्फीला विचारलं की ‘कोणत्या अभिनेत्रीला(actress) ती डान्स क्लासेस शिकण्याचा सल्ला देईल.’ उर्फीनं लगेच तृप्ती डिमरीचं नाव घेतलं. ती म्हणाली, उर्फी एक अप्रतिम अभिनेत्री आहे. ती खूप सुंदर आहे, मात्र डान्समध्ये ती थोडी मागे आहे. ‘मेरे महबूब’ गाण्यावर तिनं काय डान्स केला आहे आणि तिच्या डान्स स्टेप या खूप वाईट होत्या. उर्फी जावेदनं ही मुलाखत ‘इंस्टंट बॉलिवूड‘ला दिली होती. यावेळी याविषयी सांगताना उर्फी जावेद म्हणाली, ‘ओह्ह, खरंतर डान्ससाठी मी म्हणेन की तृप्ती डिमरी. देवा, ती इतकी चांगली अभिनेत्री आहे, तिनं जे केलं, ते फार वाईट होतं.’

उर्फी जावेदनं पुढे म्हणाली की ‘का तृप्ती का? इतकी प्रेमळ आहेस, इतकी उत्तम अभिनेत्री आहे आणि तिनं खूप वाईट डान्स केला . तिच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.’ काहींनी ती योग्य म्हणाली असं म्हटलं आहे तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, उर्फीला ट्रोल करत नेटकऱ्यांनी सांगितलं की ती योग्य बोलते, ती खरंच चांगला डान्स करत नाही, तरी सुद्धा मला ती आवडते. दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पहिल्यांदा ती जे बोलते ते मला योग्य वाटतंय. काही नेटकऱ्यांनी तृप्तीची बाजू घेतली. तृप्तीच्या चाहत्यांनी तिची बाजू घेत कमेंट केल्या आहेत.’ एक नेटकरी म्हणाला, ‘ती एक अभिनेत्री आहे, डान्सर नाही. उर्फीकडे दुसरं काय काम आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘आणि उर्फीनं शिकायला हवं की कसे कपडे परिधान करायला हवे.’

हेही वाचा :

ही सुवर्णसंधी सोडू नका! आज सोन्याचे दर पुन्हा घसरले, 24 कॅरेटचे भाव

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत;

 विवाहित पुरुषांच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या ‘या’ अभिनेत्री;