उर्वशी रौतेला रुग्णालयात दाखल; ‘प्रार्थना करा’ कॅप्शनने उडवले सोशल मीडियावर चर्चेचा धुमाकूळ

अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. 21 ऑगस्ट रोजी उर्वशीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो पोस्ट केला, ज्यात ती रुग्णालयात दाखल झाल्याचं दिसून येत आहे. फोटोमध्ये उर्वशी रुग्णालयातील सोफ्यावर बसल्याचे चित्र आहे, आणि कॅप्शनमध्ये तिने ‘माझ्यासाठी प्रार्थना करा…’ असे लिहिले आहे.(social media)

उर्वशीच्या या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतले असून, त्यावर विविध प्रतिक्रिया आल्यात. काही चाहत्यांनी तिच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली, तर काहींनी तिच्या पोस्टवर ट्रोल करत तिला प्रसिद्धी मिळवण्यासाठी ह्या प्रकारची कामं करत असल्याचा आरोप केला आहे. एका नेटकरीने टिप्पणी केली, ‘ओव्ह ऍक्टिंग की दुकान…’, तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘अशा लहान गोष्टींवर लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही’ असे म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by URVASHI RAUTELA (@urvashirautela)

उर्वशीच्या टीमने आधीच सांगितले होते की, जुलै 2024 मध्ये तिला फ्रॅक्चरमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती हैदराबादमध्ये नंदामुरी बालकृष्णा यांच्या आगामी तेलुगू चित्रपट ‘NBK 109’ साठी शूटिंग करत असताना एका ॲक्शन सीनमध्ये जखमी झाली होती. या जखमेमुळे तिला वेदना होत असल्याचे समजले आहे.

उर्वशी रौतेला तिच्या सिनेमांमुळेही चर्चेत असते. ‘सिंह साब द ग्रेट’, ‘सनम रे’, ‘ग्रेट ग्रँड मस्ती’, ‘हेट स्टोरी 4’, आणि ‘पागलपंती’ यांसारख्या चित्रपटांत तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर उर्वशी कायम सक्रिय असते, आणि तिच्या पोस्ट्सला चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो.

हेही वाचा:

रोहित शर्माचे अभूतपूर्व विक्रम: दुसऱ्या जन्मातही मोडण्याची शक्यता कमी!

जान्हवीच्या माफीने ‘बिग बॉस’च्या घरात भावनिक क्षण, पंढरीनाथ कांबळेसमोर अश्रूंनी दिली कबुली

ICC कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडूंचा दबदबा: अश्विन-जडेजा अव्वल स्थानी, रोहित-विराटचीही जोरदार