यूएस नेव्ही, इटली, आयर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी आतापर्यंत चीनचा AI चॅटबोट असलेल्या DeepSeek वर बंदी घातली आहे. यानंतर आणखी एका देशाने DeepSeek वर बंदी(Ban) घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता DeepSeek ला अनेक अडचणींचा सामना करावा लागाणार आहे. कारण काही दिवसांपूर्वीच DeepSeek ने चॅटजीपीटीपेक्षा अव्वल स्थान गाठलं होतं. मात्र आता अनेक देशांमधील बंदीमुळे DeepSeek ला मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे.
काही दिवसांपूर्वीच चीनचा AI चॅटबोट असलेल्या DeepSeek ने अमेरिकेत चॅटजीपीटीला मागे टाकलं होतं. त्यानंतर आता अमेरिकेतच DeepSeek वर बंदी(Ban) घालण्याचा विचार केला जात आहे. अहवालानुसार, काही अमेरिकन कायदेकर्त्यांनी सरकारी उपकरणांमध्ये चिनी एआय चॅटबॉट्सच्या वापरावर बंदी घालण्यासाठी एक विधेयक मांडले आहे.अनेक अमेरिकन सिनेटर सरकारी उपकरणांवर या चिनी एआय चॅटबॉटवर बंदी घालणारा कायदा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. जर कोणी DeepSeek वापरताना आढळले तर त्याला दंड होऊ शकतो आणि तुरुंगातही जावे लागू शकते.
अहवालानुसार, अमेरिकेत DeepSeek एआयवर बंदी घालण्याची योजना आहे. जर हा कायदा लागू झाला तर DeepSeek वापरणाऱ्यांना तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो. द इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, जर हे विधेयक मंजूर झाले आणि कोणीही DeepSeek वापरताना आढळले तर त्यांना 10 लाख डॉलर्स (सुमारे 6.5 कोटी रुपये) पर्यंत दंड होऊ शकतो.
एवढेच नाही तर या नियमाचे उल्लंघन करणाऱ्याला 20 वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. विधेयकानुसार, डीपसीकच्या वापरावर केवळ सरकारी उपकरणांवरच नव्हे तर खाजगी कंपन्यांमध्येही बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. जर कोणत्याही कंपनीने या एआयचा वापर केला तर तिला 100 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 8 अब्ज रुपये) पर्यंत दंड भरावा लागू शकतो.
चीनी अॅप अमेरिकन नागरिकांचा डेटा चीनी सरकारला देतात, असा आरोप केला जात आहे. याच आरोपमुळे अमेरिकेन यापूर्वी चीनी अॅप टीकटॉकवर बंदी घातली आहे आणि पुन्हा एकदा त्याच कारणामुळे चीनचा AI चॅटबोट DeepSeek वर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे. अमेरिकन सरकारचा असा विश्वास आहे की DeepSeek एआय अमेरिकन नागरिकांचा डेटा चीनी सरकारला देऊ शकते.
हे विधेयक अमेरिकेचे रिपब्लिकन सिनेटर जोश हॉली यांनी मांडले आहे. त्यांनी DeepSeek एआयच्या सुरक्षा, गोपनीयता आणि नीतिमत्तेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता लवकरच टीकटॉकप्रमाणे DeepSeek देखील अमेरिकेत बॅन केला जाण्याची शक्यता आहे.
ऑस्ट्रेलियाने अलिकडेच सर्व सरकारी प्रणाली आणि उपकरणांमधून DeepSeek एआय काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय यूएस नेव्हीने देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांना DeepSeek चा वापर करण्यास मनाई केली आहे. एवढेच नव्हे तर इटली आणि आयर्लंडने देखील DeepSeek वर बंदी घातली आहे. त्यामुळे अमेरिकेपूर्वी अनेक देशांनी DeepSeek वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय भारत सरकारने त्यांच्या कर्मचाऱ्यांना DeepSeek आणि चॅटजीपीटीचा वापर करण्यावर बंदी घातली आहे.
हेही वाचा :
‘चौथी मुंबई’ अस्तित्वात येणार, पण कुठे? वाचा सविस्तर
Infosys ने ‘हे’ कारण देत शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ!
दिल्लीत कोण मारणार बाजी आज विधानसभेचा निकाल, मतमोजणीला सुरुवात