युजर्सचा डेटा गुगलवर(Google) सेव्ह करणे अत्यंत सोपे जाते. जेव्हा पाहिजे तेव्हा हा डेटा मिळवता येतो. अगदी फोटोपासून ते मेसेजेसपर्यंत भरपूर डेटा यात सेव्ह करता येतो, परंतु हा डेटा लीक झाल्यास मोठा फटका बसू शकतो. गुगल ड्राइव्ह वापरणाऱयांनी स्पॅमपासून सावधान राहाण्याचा इशारा दिला आहे.
गुगल ड्राइव्ह वापरणारे हॅपिंगला बळी पडू शकतात. सर्वसामान्य युजर्स मालवेअर किंवा फिशिंग अटॅकला बळी पडू शकतात, असे गुगलने म्हटले आहे. (Google)गुगल ड्राइव्हवर गुगल अकाऊंट युजर्सना एक संशयास्पद फाइल पाठवली जात असून काही युजर्सनी याबाबत तक्रारही केली आहे. गुगल अकाऊंटवर फाइल रिसीव्ह करण्याची रिक्वेस्ट मिळाल्याचे युजर्सनी म्हटले आहे. जर कुणाला अशी कोणतीही संशयास्पद फाइल आढळली तर ती स्पॅम पॅटेगिरीमध्ये मार्क करण्याचा सल्ला गुगलने दिला आहे.
स्मार्टपह्नमध्ये कोणतेही फाईल आल्यास स्क्रीनच्या वर तीन डॉट्स दिसतील. यानंतर तुम्हाला रिपोर्ट ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. जर फाइल ओपन असेल तर तुम्हाला राइट क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला ब्लॉक किंवा रिपोर्टचा पर्याय मिळेल, असे गुगलने स्पष्ट केले आहे.
जर तुम्ही कोणत्याही
संशयास्पद फाइलला एक्सेप्ट करण्याचे अप्रूव्हल दिले असेल तर त्या लिंकवर किंवा डॉक्युमेंटवर अजिबात क्लिक करू नका, असे आवाहन गुगलने केले आहे.
हेही वाचा :
कालचा गोंधळ बरा होता! सामान्य माणसाची प्रतिक्रिया
काँग्रेसला मोठा धक्का! गौरव वल्लभ यांनी दिला पक्षाचा राजीनामा
नारायण राणेंचा पराभव केला, तर श्रीकांत शिंदे अजूनही ‘बच्चा’; संजय राऊत यांचा हल्लाबोल