मसाजोग जि. बीड येथील सरपंच श्री. संतोष देशमुख यांच्या निर्घृण (strong)हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व समविचारी संघटनांकडून आज इचलकरंजी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

महात्मा गांधी पुतळ्यासमोर (strong)जमलेल्या आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. हत्येच्या मुख्य सूत्रधारांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.या आंदोलनात महाविकास आघाडीचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने (strong)उपस्थित होते. सरकारने तातडीने कारवाई करून आरोपींना शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.
हेही वाचा :
वजन कमी करायचंय? मग सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा ओट्स ऑम्लेट
शक्तिपीठ महामार्गावरील मंदिरांसाठी ५-५ हजार कोटी निधी देऊन विकास साधावा – आमदार सतेज पाटील
महिमा चौधरीच्या 17 वर्षांच्या लेकीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष