वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली? ऑक्सिजन लावले…

बीड मधील सरपंच हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. यामध्ये राजकीय(political) नेत्यांनी देखील आरोप-प्रत्यारोप केले आहेत. कारण बीडच्या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनी तर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. अशातच वाल्मिक कराडने काल सीआयडीसमोर शरणागत झाल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराडने(political) काल सीआयडीसमोर शरणागती पत्करली. वाल्मिक कराडला न्यायालयाने 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. अशातच रात्री दीड वाजता केज न्यायालयातून बीड शहर पोलीस ठाण्यात कराडला आणण्यात आले होते.

मात्र त्यानंतर वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्याला काही वेळ ऑक्सिजन लावावे लागले. तसेच सीआयडीच्या कोठडीत रात्री त्याची शुगर वाढली. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी ऑक्सिजन मास्क लावला आहे.

वाल्मिक कराड याची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली. त्याला रात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यावेळी त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर त्याला ऑक्सिजन लावण्यात आले. रात्री उशिरा तुरुंगात गेल्याने वाल्मिक कराड हा सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उठला. सकाळी त्याने चहा, नाश्तादेखील घेतला नाही. वाल्मिक कराडला मधुमेहचा त्रास असल्याने त्याने आग्रह केल्यानंतर सकाळी 11.30 वाजता सरकारी जेवण घेतले. त्याने साधारण अर्धी चपाती खाल्ली असल्याची माहिती आहे.

सीआयडीचे एसपी बीड शहर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी दाखल झाले आहे. त्यांनी देखील वाल्मिकी कराडची चौकशी सुरु केली आहे. अशातच आज वाल्मिक कराडचा सीआयडी कोठडीचा आज पहिला दिवस आहे. त्यामुळे आता तपासादरम्यान पोलिसांना नेमकी काय माहिती मिळती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

धनंजय मुंडेंचा पक्षातूनच गेम होतोय ?; पालकमंत्रीपद लांबच राहिलं आता मंत्रिपदही जाणार?

अनुराग कश्यपने बॉलिवूड इंडस्ट्रीची काढली अक्कल; घेतला सर्वात मोठा निर्णय

‘मी पवार साहेबांना फसवलं, आता त्यांच्यासमोर लोटांगण घालून पाया…’; ‘या’ आमदाराचं मोठं वक्तव्य