वर्षा गायकवाड दलित असल्याने उमेदवारी नाकारली, मिलिंद देवरा आरोप

देवरा यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये देवरा यांनी(anti) उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि ठाकरे गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते.

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या दलित असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मध्य मुंबईची जागा त्यांना सोडण्यास नकार दिला, असा आरोप शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी शुक्रवारी केला. दक्षिण मध्य मुंबई हा खुल्या प्रवर्गातील मतदारसंघ आहे. त्यामुळे येथून वर्षा गायकवाडांच्या रूपाने दलित चेहरा दिल्यास नुकसान होऊ शकते, असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांना (anti)सांगितल्याचा दावा देवरा यांनी केला आहे. यातून काँग्रेस आणि ठाकरे गटाची दलितविरोधी मासनिकता दिसून येते, असेही त्यांनी म्हटले आहे.

देवरा यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये देवरा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना म्हटले आहे की, दक्षिण मध्य मुंबईत वर्षा गायकवाड यांना तिकीट न देणे यातून काँग्रेस आणि ठाकरे गटाची दलित विरोधी मानसिकता दिसून येते. ठाकरे गट महाराष्ट्रात २१ जागांवर निवडणूक लढवत आहे. मात्र त्यात केवळ एका जागेवर ठाकरे गटाने दलित उमेदवाराला संधी दिली आहे. आम्ही या निवडणुकीत तीन दलित उमेदवारांना संधी दिली आहे. महाविकास आघाडीत दलित उमेदवारांची कुचंबणा होत आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटात दलित समाजबांधवांना स्थान आणि मान नाही. खुल्या मतदारसंघातून दलित उमेदवार उभा करण्याची त्यांच्यात हिंमत नाही, असेही देवरा यांनी म्हटले आहे.

‘निवडणुकीत दलित समाजाची मते हवीत, परंतु या समाजाला नेतृत्वाची संधी द्यायची नाही, अशी दुटप्पी भूमिका ठाकरे गटाची दिसून येते. वर्षा गायकवाड यांना खुल्या जागेवर (दक्षिण-मध्य मुंबई) उमेदवारी दिली तर दलित असल्यामुळे त्यांचा पराभव होईल असे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला कळवल्याची माझ्याकडे माहिती आहे. एक सुशिक्षित, सक्षम आणि राजकारणात आपल्या कामगिरीने ठसा उमटवणाऱ्या वर्षा गायकवाड यांच्याबाबत जे राजकारण होत आहे ते दुर्देवी आहे. अशा मानसिकतेचा मी निषेध करतो,’ असेही देवरा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा :

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज नांदेडमध्ये पार पडणार सभा

मध्य पूर्वेवर युद्धाचे सावट

महायुतीमध्ये प्रचारादरम्यान धुसफुस, गजानन किर्तिकर