हार्दिकच्या पाठीशी वीरू

आयपीएलच्या प्रारंभीच्या सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी हे मुंबई इंडियन्ससाठी नवे नाही. रोहित शर्माकडे (MI)नेतृत्व असताना सलग पाच सामने मुंबईने गमवले होते. आता तर मुंबईने पराभवाची हॅटट्रिक केली आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स हार्दिक पंडय़ाच्या पाठीशी संयमी आणि खंबीरपणे उभी राहिल, अशा शब्दांत हिंदुस्थानचा स्पह्टक फलंदाज वीरेंद्र सेहवागने हरणाऱया हार्दिकची पाठराखण केली आहे. मात्र यापेक्षा अधिक सामने हरले तर मात्र संघ व्यवस्थापनाच्या संयमाची ती परीक्षा असेल, असेही तो म्हणाला.

मुंबई इंडियन्स संघ व्यवस्थापनाने रोहितचे कर्णधारपद काढून घेत ते हार्दिकच्या हातात दिले. त्यानंतर संघ व्यवस्थापनासह हार्दिकला क्रिकेटप्रेमींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. (MI)गेल्या तिन्ही सामन्यांत मुंबईच्या चाहत्यांनी पंडय़ाची खिल्ली उडवत आपला राग व्यक्त केला आहे आणि मुंबईच्या सलग तीन पराभवांमुळे चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. जर चौथ्या सामन्यातही हार्दिकच्या नेतृत्वाखाली पराभवाची झळ बसली तर ती हार्दिक पंडय़ासाठी फार महागात पडू शकते, असे भाकीत वर्तवले जात आहे. मात्र अशा स्थितीतही वीरूने हार्दिकला दिलेल्या पाठिंब्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुंबई गेल्या अनेक आयपीएल सिझनमध्ये सुरुवातीचे सामने हरलेली आहे. रोहितच्या नेतृत्वात 2014 मध्ये सुरुवातीचे पाच सामने गमावलेले असतानादेखील ते प्ले आफॅमध्ये पोहोचले होते. त्यामुळे तीन-चार पराभवांमुळे मुंबई इंडियन्स नेतृत्व बदलाचा नक्कीच विचार करणार नाही. मात्र सात सामन्यांनंतर जेव्हा स्पर्धा अर्ध्यावर असेल तेव्हा ते कामगिरीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात. ती वेळ योग्य ठरेल, असेही सेहवाग म्हणाला.

हेही वाचा :

यंदा KKR पटकावणार IPL 2024 स्पर्धेची ट्रॉफी! असा आहे योगायोग

Google सर्चसाठी द्यावे लागतील पैसे? कंपनीकडून तयारी सुरु

सांगलीवरून मविआत रस्सीखेच, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ