VIDEO : MBA कॉलेजमध्ये धक्कादायक घटना: कॉपी रोखल्याने शिक्षकाला मारहाण

परिक्षा म्हटलं की काही(students) विद्यार्थ्यांना जणू घामच फुटतो. कारण वर्षभर अभ्यास केलेला नसतो. मग पासिंगपुरते मार्क मिळवण्यासाठी ते रात्रभर अभ्यास करतात. आणि परिक्षेत मोजक्या प्रश्नांची उत्तरं लिहून पास होतात. पण काही विद्यार्थांना एवढी मेहनत सुद्धा करायची नसते.

मग ते कॉपीचा आधार घेतात. पट्टी, पेन, पॅड, सॉक्स अशा वस्तूंमध्ये चिमुकल्या चिट्स लपवतात आणि उत्तरं कॉपी करतात. पण या (students)विद्यार्थांना शिक्षक बरोबर पकडतात. त्यांची चोर नजर शिक्षकांना बरोबर कळते.

अशाच एका विद्यार्थ्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा विद्यार्थी सुद्धा परिक्षेत कॉपी करत होता. पण शिक्षकांनी पकडल्यावर माफी मागण्याऐवजी त्यानं भलतंच काम केलं. रागाच्या भरात थेट शिक्षकांनाच तो मारू लागला. होय, विश्वास बसत नाहीये? तर मग हा व्हिडीओ एकदा पाहाच. या मुलाचा आवेश पाहून तुम्ही देखील थक्कच व्हाल.

चोर तो चोर आणि वर शिरजोर ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला या म्हणीची प्रचिती येईल. राजस्थानमधील एका विद्यार्थ्याला MBA ची परिक्षा देत असताना कॉपी केल्याच्या आरोपावरून पकडण्यात आलं.

ही घटना मुगनीराम बांगुर मेमोरियल विश्वविद्यालयात घडली आहे. खरं तर परिक्षेत कॉपी करणं ही काही नवी गोष्ट नाहीये. पण हा मुलगा थेट मोबाईलवरून प्रश्नांची उत्तरं शोधत होता. आणि जेव्हा शिक्षकांनी पकडलं तेव्हा तो उलट शिक्षकांनाच मारहाण करू लागला. कारण त्याला उर्वरीत पेपर सोडवायचा होता पण एग्जामिनर त्याला वर्गातून बाहेर काढत होता.

शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. परिणामी विद्यार्थ्याला रोखण्यासाठी मग इतर शिक्षक धावून आले. या सर्वांनी मिळून त्या विद्यार्थ्याला रोखलं. पण तरी देखील त्या आक्रमकपणा काही कमी झाला नाही. उलट तो शिक्षकांना बघून घेईन अशी धमकी देऊ लागला.

दरम्यान आसपास जमलेल्या लोकांनी ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. आणि आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या विद्यार्थ्याचा संबंध एका राजकीय पार्टीशी असल्याचा म्हटला जातोय. असो, पण आता तुम्हीच सांगा अशा विद्यार्थ्यांवर कोणती कारवाई केली पाहिजे? आपल्या प्रतिक्रिया द्या.

हेही वाचा :

नागा साधूंचं रहस्यमय जीवन: कुंभमेळ्यानंतर ते कुठे जातात?

पीएम किसानच्या 19व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी: 2000 रुपये कधी येणार?

थंडीत निरोगी राहण्यासाठी बनवा नाचणी सूप, सोपी रेसिपी जाणून घ्या