सोशल मीडियावर (social media)दररोज अनेक वेगेवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज बऱ्याचदा आपल्याला हसवतात तर कधी थक्क करून जातात. इथे वन्य प्राण्यांच्या जीवनाशी निगडित देखील अनेक व्हिडिओज शेअर केले जातात.
लोकांना असे व्हिडिओज पाहायला फार आवडते ज्यामुळे हे व्हिडिओज कमी वेळातच व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडिओ (social media)सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात एक कोल्हा जंगलाच्या राजाशी मस्ती करताना दिसून येत आहे.
वन्य प्राण्यांना कुठे धोका आहे आणि कुठे नाही याची चांगली समज आहे. विशेषत: कोल्हा हा जंगलातील सर्वात हुशार आणि चपळ प्राणी असल्याचे म्हटले जाते. तसेच सिंह हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. त्यांच्याशी पंगा घेणं म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासारखं आहे.
मात्र हे आव्हान यावेळी कोल्ह्याने स्वीकारल्याचे दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत एक कोल्हा झोपलेल्या सिंहाची खोड काढताना दिसून आला. व्हिडिओतील हे दृश्य फार मजेदार वाटू लागते मात्र तितक्यात सिंह झोपेतून उठतो आणि मग पुढे काय घडते ते तुम्हीच व्हायरल व्हिडिओतून जाणून घ्या.
व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, सिंह जंगलात एका झाडाखाली विश्रांती घेत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात तिथे दबक्या पावलांनी एक खोडकर कोल्हा मागून येतो आणि सिंहाची शेपूट ओढून पळून जातो. यानंतर सिंह दचकून उठतो आणि आजूबाजूला पाहू लागतो.
सिंह उठताच कोल्हा तेथून वाऱ्याच्या वेगाने पळून जातो. यावेळी सिंह झोपेत इतका मग्न झालेला असतो की तेथून उठण्याचीही इच्छा होत नाही आणि तो पुन्हा आपल्या स्वप्ननगरीत विलीन होऊन जातो. दरम्यान हा व्हिडिओ आता युजर्सच्या चांगलाच पसंतीस पडला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडिओ @lionsightings नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘आपल्या सर्वांना अशा धैर्याची गरज आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो युजर्सने पाहिले अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत.
एका युजरने लिहिले आहे, “त्याची इच्छा आहे की सिंहाने उठावे आणि शिकार करावी जेणेकरून त्यालाही खायला मिळेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला खात्री आहे की कोल्ह्याने आणि त्याच्या मित्रांनी त्यावर पैज लावली होती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
हेही वाचा :
प्रत्येक पत्नीची 5 अपेक्षा नवऱ्याकडून, शेवटची पूर्ण झाली नाही तर नातं उध्वस्त!
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी कधी? जाणून घ्या पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त!
प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, नंतर रचला पती बेपत्ता झाल्याचा बनाव