Video : हत्तीसमोर तरुणाची ताकद, पुढे तरुणाचं काय झालं हे पाहा,? तुम्हालाही होईल धक्का!

हत्ती (Elephant)हा तसा शांत प्रवृत्तीचा प्राणी आहे. तुम्ही आपलं काम करा मी माझं काम करतो अशा आवेगात तो आपलं आयुष्य जगतो. तो उगाचच इतर प्राण्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. शिवाय तो शाकाहारी प्राणी असल्यामुळे इतर प्राण्यांवर नजर ठेवण्याचा प्रश्न देखील उद्भवत नाही.

पण हत्तीला (Elephant)जेव्हा राग येतो तेव्हा मात्र अख्खं जंगल थरथर कापतं. कारण पिसाळलेला हत्ती समोर येईल त्या गोष्टीला उडवून टाकतो. अगदी मोठमोठाली झाडं सुद्धा पार मुळासकट तो उपटून काढतो. अशाच एका संतापलेल्या हत्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुण कारण नसताना या हत्तीचा डिवचण्याचं काम करत होता. त्यावेळी हत्ती चिढला आणि त्यानं पुढे काय केलं हे आता तुम्हीच पाहा.

हा व्हिडीओ @ParveenKaswan या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका तरुणाला हत्तीला त्रास देताना पाहू शकता. हा तरुण उगाचच कारण नसताना बिचाऱ्या हत्तीचा डिवचत आहे. दरम्यान हत्तीनं हल्ला करण्याचा इशारा दिला. पण तो तरुण काही ऐकला नाही.

उलट हत्ती माघारी फिरताच त्यानं पुन्हा त्याची छेड काढली. त्यामुळे हत्तीचा पारा हळूहळू आणखी चिढला आणि हत्ती त्याचा पाठलाग करून लागला. पण तेवढ्यात हत्तीचा कळप रस्ता सोडून जंगलाच्या दिशेनं जाऊ लागला. त्यामुळे शेवटी हत्तीनं या तरुणाचा नाद सोडला आणि कुटुंबासोबत तो जंगलात जाऊ लागला. या प्रकरणात हत्तीनं स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

काही प्राणी तज्ज्ञांच्या मते हत्तीचा आकार मोठा आहे. त्यामुळे त्याचा वेग कमी आहे. पण हत्तीनं जर तुमचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला तर १०० कि.मी. सुद्धा तो तुमच्यामागे पळत येईल. हत्तीचं नाक ते कुत्र्यांप्रमाणेच तिक्ष्ण असतं. परिणामी तुम्ही अगदी गाडीत बसून पळ काढला तरी देखील हत्ती तुम्हाला सोडणार नाही.

तुमच्या शरीराच्या गंधाचा पाठलाग करून तो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. त्यामुळे या व्हिडीओमधील तरुण थोडक्यात वाचला. कारण तो तरुण जर हत्तीच्या तावडीत सापडला असता तर मग काही सेकंदात त्याला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची वेळ आली असती.

हेही वाचा :

धनुषचा अनोखा अंदाज: चाहत्यांना ‘पोंगल’च्या शुभेच्छा आणि आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!

इंजिनिअर पती पत्नीसमोरच ठेवायचा प्रेयसीसोबत लैंगिक संबंध, दोघींनी मिळून केली हत्या अन् जाळला मृतदेह

महिला नागा साधूंनाही नग्न व्हावे लागते का? काय आहेत नियम? रहस्यमयी ठिकाणी असतं वास्तव!