भाजपने आगामी स्थानिक स्वराज्य (movement)संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक पुनर्रचनेला गती दिली आहे. राज्यभरातील 1196 मंडल अध्यक्षांची निवड 20 एप्रिल रोजी निरीक्षकांच्या देखरेखीखाली पार पडणार असून, यानंतर 22 एप्रिलपासून जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ही माहिती भाजप प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.या पार्श्वभूमीवर इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातही भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत या मतदारसंघात एकच मंडल अध्यक्ष होता, मात्र पक्षाच्या नवीन रचने नुसार आता इचलकरंजी पूर्व, इचलकरंजी पश्चिम आणि इचलकरंजी ग्रामीण अशा तीन स्वतंत्र मंडल अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि चुरस वाढली आहे.

ग्रामीण मंडलसाठी संभाव्य नावे:
१) सुधीर पाटील
२) बाळासाहेब माने
३) विनोद कोराने
४) महेश पाटील
५) संजय चोपडे
पश्चिम मंडलसाठी संभाव्य नावे:
१) शशिकांत मोहिते
२) बंडू मुळीक
३) दीपक सुर्वे
४) प्रमोद बचाटे
पूर्व मंडलसाठी संभाव्य नावे:
१) किसन शिंदे
२) सतीश पंडित
३) अरुण कुंभार
४) सुनील पाटील
५) रंगराव खवरे
६) संजय नागुरे
७) संजय केंगार
या नावांवर जिल्हा निरीक्षक व वरिष्ठ (movement)नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून, येत्या काही तासांत निवड प्रक्रिया पूर्ण होऊन अधिकृत मंडल अध्यक्षांची घोषणा होण्याची शक्यता आहे.भाजपची ही संघटनात्मक पुनर्रचना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात असून,(movement) स्थानिक पातळीवर सक्रिय कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :
कोल्हापूर : नृत्यांगणास गुलाबाचे फुल दिले अन्…; लावणी कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी
‘दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर….’,शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया
गेट टुगेदरला भेट, जुनं प्रेम जिवंत!, महिलेनं केलेलं कृत्य ऐकून पायाखालची जमीन सरकेल