ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान विजय वर्मा- तमन्ना भाटिया यांनी रवीना टंडनच्या घरी साजरी केली होळी; Video Viral

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली होती. लग्नाच्या चर्चांदरम्यानच ह्या कपलच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. आता अशातच होळी पार्टीमध्ये हे दोघंही एकत्र होळी(Holi) सेलिब्रेट करताना दिसले. कारण ठरलं, रविना टंडनच्या घरी होळी पार्टीचं… रविना टंडनच्या घरी होळी पार्टीसाठी तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा पोहोचले.

होळी पार्टीसाठी हे दोघंही एकत्र नाही पण, एका पाठोपाठ पार्टीसाठी पोहोचले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये, रवीना टंडनच्या घरी हे दोघंही एका पाठोपाठ एक जात असल्याचं पापाराझींनी कॅमेऱ्यात कैद केलं. ब्रेकअपच्या चर्चांनंतर विजय आणि तमन्ना चक्क एकत्रच होळी साजरी करत आहेत. यावरुन त्यांचं पॅचअप झालं का अशी चर्चा रंगली आहे.

‘विरल भय्यानी’ या पेजवरून काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनच्या घरी होळी(Holi) पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीसाठी अवघी बॉलिवूड इंडस्ट्री अवतरली होती. विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया सुद्धा होळी पार्टीसाठी आले होते. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान दोघेही एकत्र स्पॉट झाले होते. पण होळी पार्टी दरम्यान दोघंही वेगवेगळ्या वेळी पोहोचले होते.

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान दोघंही एकत्रच होळी साजरी करत असल्याने सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. दोघांचं परत पॅचअप झालं का? असे प्रश्न चाहते विचारत आहेत. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दरम्यान, तमन्ना आणि विजय रवीना टंडनच्या घरी एकमेकांना भेटले की नाही ? ते एकमेकांशी बोलले की नाही ? त्यांनी एकत्रित होळी खेळली की नाही ? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्यापही गुलदस्त्यातच आहे.

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली. मात्र अद्याप दोघांकडून या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं नाही. तमन्ना आणि विजय दोघंही रवीना टंडनची लेक राशाच्या जवळचे आहेत. राशानेच दोघांना होळी पार्टीचं आमंत्रण दिलं. त्यामुळे तिच्यासाठी दोघं एकत्र आल्याचा अंदाज आहे.

एक युजर म्हणतो की, रवीना टंडन त्या दोघांच्याही नात्यात शांतता निर्माण करू इच्छिते. तर आणखी एक युजर म्हणतो की, दोघांचे ब्रेकअप झाले आहे. म्हणूनच दोघेही एकत्र दिसले आहेत ना ? एकंदरीत, असे म्हणता येईल की लोक अजूनही सोशल मीडियावर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांवर चर्चा करत आहेत. ज्या पद्धतीने ते दोघेही रवीना टंडनच्या घरी वेगळे पोहोचले, त्यावरून त्यांच्या ब्रेकअपची अफवा लोकांना खरी वाटते. पण त्यांनी अद्याप त्यांच्या ब्रेकअपची औपचारिक घोषणा केलेली नाही.

हेही वाचा :

‘इतक्या’ वयाच्या मुलांना नाही लागत तिकीट! 99% लोकांना नसतं माहिती!

खोक्याला ७ दिवसांची पोलीस कोठडी, तुरुंगात डांबण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात काय सांगितलं?

ताणतणाव वाढलाय? वेळीच ‘हे’ उपाय केले नाहीत तर हरवून जाते शांती अन् समाधान