विधानसभेसाठी(political) एक दिवस शिल्लक असताना राज्यात नाट्यमय घडामोडी घडताना दिसून येत आहे. सध्या विरारमध्ये चांगलाच राजकीय ड्रामा पाहायला मिळत आहे. येथे पैसे वाटल्याच्या आरोपांवरून भाजप आणि बविआमध्ये तूफान राडा झाला आहे. भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटले, असा आरोप बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
विनोद तावडे हे विरारमधील(political) एका हॉटेलमध्ये 5 कोटी रुपये घेऊन आले होते. ही गोष्ट बविआच्या कार्यकर्त्यांना समजली तेव्हा त्यांनी हॉटेलवर धाव घेतली. यानंतर हॉटेलमध्ये बविआ आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचे दिसून आले. बविआ कार्यकर्त्यांनी तावडे यांना घरल्याचेही यावेळी दिसून आले.
विनोद तावडे हे मंगळवारी विरार पूर्वेला असणाऱ्या मनोरीपाडा येथील विवांत हॉटेलमध्ये आले होते. त्यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि भाजपचे काही पदाधिकारी हॉटेलमध्ये आले होते. त्यांच्यात बैठक सुरु होती, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. या बैठकीबाबत संपूर्ण माहिती असलेली डायरी देखील आपल्याकडे असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केलाय.
माझ्याकडे डायरी असून त्यात कुणाला पैसे वाटण्यात आले, त्याची माहिती आहे. वसई पश्चिम 5 अशा प्रकारे कोणत्या भागात किती पैसे पोहोचवायचे असं त्यात लिहिलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी पैसे देताना पकडले असल्याचंही हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. तसेच, पैसे वाटताना तावडे यांनी विणवण्या केल्या, ते हॉटेलमध्ये दुसऱ्या माळ्यावर कुठेतरी बसले असल्याचं हितेंद्र ठाकूर म्हणाले आहेत. तावडे यांना कारवाईशिवाय सोडणार नाही, असा इशारा देखील हितेंद्र ठाकूर यांनी दिलाय.
हेही वाचा :
नयनतारानं Ex बॉयफ्रेंडमुळे सोडलेली चित्रपटसृष्टी
लग्नसराईच्या दिवसांत सलग दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं; जाणून घ्या 18,22,24 कॅरेटचे भाव
मोठी बातमी! शिंदेंच्या अडचणींमध्ये वाढ? मतदानाच्या आदल्या दिवशी EC ची नोटीस; 24 तासांत…