कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रातील राजकारणाची(politics) पातळी कल्पनेपेक्षा अधिक घसरली आहे आणि त्याचे प्रत्यंतर येणाऱ्या उदाहरणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. भारतीय जनता पक्षाचे विदर्भातील एक वाचाळ वीर भलतेच बदलले आहेत. राहुल गांधी यांच्या जिभेला चटके देण्याची तसेच त्यांची जीव छाटणाऱ्यास अकरा लाखाचे बक्षीस देण्याची भाषा अजिबात समर्थनीय नाही.
सर्वसामान्य माणसाकडून त्याचा निषेध होणे, काँग्रेस(politics) कार्यकर्त्यांनी आक्रमक होणे, नेत्यांनी जहाल प्रतिक्रिया देणे अपेक्षित आहे, स्वाभाविक आहे. राजकारणात हिंसेची भाषा करणाऱ्या वर संबंधित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तातडीने कारवाई केली पाहिजे शिवाय पोलीस प्रशासनाने त्याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांच्या वर गुन्हे दाखल करणे अपेक्षित आहे.
राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात जॉर्ज टाऊन विद्यापीठांमध्ये बोलताना भारतातील आरक्षण व्यवस्थेवर काही भाष्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचा मीडियातून काहीसा विपर्यास झालेला आहे. त्यानंतर संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करून राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. आता त्यात भारतीय जनता पक्षाचे अमरावती येथील नेते अनिल बोंडे यांच्या वक्तव्याची भर पडली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जिभ छाटण्यापेक्षा त्यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
गायकवाड आणि बोंडे यांचे वक्तव्य हे वादग्रस्त नाही तर हिंसक आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे समर्थन करत नाही आणि त्यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमतही नाही असा खुलासा केला असला तरी त्यांनी स्वपक्षीय अनिल बोंडे यांच्यावर तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी अनिल बोंडे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते मूर्ख आहेत, त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, त्यांना दंगली घडवायच्या आहेत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. वास्तविक पोलिसांनी कोणाकडून फिर्याद येईल याची वाट न पाहता गायकवाड आणि बोंडे या दोघांच्या वरही गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात(politics) वाचाळ वीरांची कमतरता नाही. या वाचाळविरांनी अनेकदा प्रक्षोभक, वादग्रस्त विधाने केलेली आहेत. काहींनी शिवराळ भाषा वापरली आहे. त्याला”स्लीप ऑफ टंग”असे म्हणता येणार नाही. तर त्यांनी जाणीवपूर्वक वादग्रस्त विधाने केलेली आहेत. संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांचे वक्तव्य मात्र कुणीही मान्य करणार नाही, या दोघांच्या वर गुन्हे दाखल केले पाहिजेत अशीच मागणी सामान्य माणसाकडून केली जाईल. अशा प्रकारचे हिंसक वक्तव्य महाराष्ट्रात पहिल्यांदाच करण्यात आले आहे. वास्तविक संबंधित राजकीय पक्षाच्या नेत्यांनी या दोघांनाही पक्षातून तातडीने अर्धचंद्र दिला पाहिजे.
राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने नवी दिल्लीतील तो घलक रोड पोलीस ठाण्यात संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. तेथे त्यांच्यावर गुन्हा दाखलही होईल. तथापि या दोघांच्या विरुद्ध महाराष्ट्रात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होणे गरजेचे आहे.
राहुल गांधी यांनी जॉर्जेट टाउन विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या समोर भाषण केले. भाषणानंतर विद्यार्थ्यांकडून काही प्रश्न विचारण्याची प्रथा त्या विद्यापीठात आहे. भाषण संपल्यानंतर एका विद्यार्थ्याने भारतामध्ये आरक्षण किती काळ राहणार असा एक प्रश्न विचारला होता. जेव्हा भारत समृद्ध होईल, सर्वांना विकासाच्या समान संधी मिळतील तेव्हा आरक्षणाची गरजच राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा आरक्षण रद्द करण्याचा विचार करता येईल असे उत्तर राहुल गांधी यांनी या प्रश्नावर दिले होते.
आता त्यांनी दिलेल्या उत्तरात काही आक्षेपार्ह आहे असे कोणी म्हणणार नाही. पण राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी भूमिका घेतल्याची टीका भारतीय जनता पक्षाकडून सुरू झाल्यानंतर काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष सुरू झाला. राष्ट्रीय काँग्रेस ही आरक्षण विरोधी आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधी आहे अशा प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाच्या बहुतांशी नेत्यांच्याकडून व्यक्त झाल्या.
राहुल गांधी(politics) यांनी आपण आरक्षण विरोधी नव्हतो आणि नाही. उलट आरक्षण मर्यादा वाढवण्यात यावी अशी माझी मागणी आहे त्यामुळे कुणाचे आरक्षण रद्द करावे अशी माझी आणि काँग्रेसची अजिबात मानसिकता नाही असा स्पष्ट खुलासा त्यांनी केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी ही राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते पण तसे त्यांच्याकडून घडलेले नाही.
राहुल गांधी यांच्या भाषणाचा वृत्तांत भारतीय वृत्तपत्रांमध्ये जो आला आहे, त्यावर आधारित भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी विरोधी भूमिका घेतलेली आहे. विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या असल्यामुळे त्यांची भूमिका अधिक टोकदार बनली आहे.
निवडणूक काळात राहुल गांधी यांच्या विरोधात ते आरक्षण विरोधी कसे आहेत हाच मुद्दा प्रचारातून मानला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राहुल गांधी यांचा निषेध करणे, त्यांच्याविरुद्ध आंदोलन करणे हे मान्य करता येईल पण जीभ छाटून टाका, जिभेला चटके द्या ही भाषा कोणीही मान्य करणार नाही, तिचे समर्थनही कोणी करणार नाही.
हेही वाचा:
मराठा आरक्षणासाठी २७ वर्षांच्या तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
आनंदवार्ता! पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या 1 लिटरचे लेटेस्ट दर
स्वामी समर्थांबाबत ज्ञानेश महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य, नितेश राणेंचा आज सांगलीत हिंदू जन आक्रोश मोर्चा