Viral Video: लग्न गेलं उडत! मला का मारलं? नवरा-नवरीचा स्टेजवरच राडा

लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक खास आणि(wedding) अविस्मरणीय क्षण असतो. मात्र, अनेकदा या आनंदाच्या क्षणी काही गंमतीशीर किंवा चकित करणाऱ्या गोष्टी घडतात. अशीच एक घटना नुकतीच एका लग्नात घडली आहे, जिथे नवरी-नवरदेवामध्ये लग्नाच्या स्टेजवर जोरदार हाणामारी झालेली आहे.

व्हायरल होत असलेल्या घटनेत तुम्हाला स्टेजवर नवरा-नवरी एकमेकांना पेढा भरवताना दिसत आहे. सुरुवातीला सगळं ठीक दिसत आहे, पण नवरदेवाने नवरीला जबरदस्तीने मोठा पेढा भरवला. मात्र, त्यानंतर संतापलेल्या नवरीने चक्क नवरदेवाला जोरदार कानाखाली लगावली. हा धक्का बसल्याने नवरदेव संतापला आणि त्यानेही नवरीला प्रतिउत्तर दिले. त्यानंतर अचानक स्टेजवर झालेल्या या प्रकारामुळे लग्नात (wedding)आलेले पाहुणे आणि नातेवाईक सैरभैर झाले.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, अनेक लोकांनी यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यातील कमेंट बॉक्समध्ये काही यूजर्संनी लिहिले आहे,”आमच्याकडे असं झालं असतं तर पाहुण्यांमध्येही राडा झाला असता” तर दुसऱ्या यूजरने लिहिले आहे,”हद्दच झाली दोघांची” तर तिसऱ्या यूजरने लिहिले,”नवरी जाम डेंजर दिसतेय”, अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.लग्नातील(wedding) हा प्रकार कुठे घडला आणि कधीचा आहे हे अजून समजले नाही. मात्र ती घटना एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ ‘ या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे.

हेही वाचा :

मार्चचा शेवटचा आठवडा गेमचेंजर ठरणार! ‘या’ 3 राशींचा गोल्डन टाईम सुरू

प्रियकरासह समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी आली होती प्रेयसी, पण… Video Viral

‘खल्लासच करतो’ म्हणत तरुणाला बेदम मारहाण, व्हिडिओ व्हा