लाईव्ह सामन्यात भयंकर संतापला विराट कोहली, थेट अंपायरशीच भिडला आणि पुढे….!

शनिवारी आयपीएलमध्ये 68 वा सामना खेळवण्यात आला(umpire). बंगळूरूच्या चिन्नस्वामी मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना रंगला होता. या सामन्यामध्ये बंगळूरूने 27 रन्सने चेन्नईचा पराभव केला. इतकंच नाही. तर या विजयासह आरसीबीच्या टीमने थेट प्लेऑफचं तिकीट गाठलं आहे. मात्र हा सामना सुरु असताना अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या पहायला मिळाल्या. यावेळी सामन्यात विराट कोहली अंपायरशी भिडताना देखील दिसल्या.

चेन्नई विरूद्ध बंगळूरूच्या सामन्यात अनेक ड्रामे झाले(umpire). हा सामना थ्रिलरपेक्षा कमी नव्हता. या सामन्यादरम्यान आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीही खूप चर्चेत होता. कोहलीने या सामन्यात उत्तम फलंदाजी केली खरी मात्र मैदानावरील अंपायरशी त्याचा आणि डुप्लेसिसचा थोडासा वाद झाला.

या सामन्यात नेमकं काय झालं की विराट आणि फाफ थेट अंपायरशी भिडले ते पाहूयात. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 12 वी ओव्हर लॉकी फर्ग्युसन टाकत होता. रचिन रवींद्रने त्याच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर फोर लगावली. यानंतर बॉल टाकलाता तो ओला असल्याने हातातून निसटला आणि रचिनच्या हेल्मेटजवळ गेला.

यानंतर फॅफने अंपायरला बॉल बदलण्याची विनंती केली. मात्र अंपायरने तो बदलण्यास नकार दिला. यानंतर विराट कोहली आणि अंपायर यांच्यात जोरदार वादावादी झाली. कर्णधार फाफ डुप्लेसिससह विराट कोहली आणि गोलंदाज लॉकी फर्ग्युसन अंपायरकडे आले. तिघेही अंपायरवर खूप नाराज दिसले. याच कारणाने विराट कोहली खूपच निराश दिसत होता.

https://twitter.com/i/status/1791886672503902590

आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध उत्तम फलंदाजी केली. यावेळी विराटने 47 रन्सची मोठी खेळी खेळली. या खेळीदरम्यान विराट कोहलीने 4 सिक्स आणि 3 फोर लगावले. या सिझनमध्ये विराटने 700 हून अधिक रन्सची केले आहेत. कोहलीने या सिझनमध्ये 6 अर्धशतकं आणि 1 शतक झळकावलंय. याशिवाय सर्वाधिक रन्स करणारा तो फलंदाज असल्याने ऑरेंज कॅपचाही तो मानकरी आहे.

हेही वाचा :

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ मध्ये भारतीय रील स्टारचा जलवा

मुसळधार पावसामुळे खेळ थांबला, चाहते नाराज

कारखान्यांच्या जादा उत्पन्नातील पैसे शेतकऱ्यांना देण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूरी द्यावी